Farmer Scheme | केंद्र सरकारची शेतकऱ्यांसाठी नवी योजना, आता घरबसल्या घेता येणार लाभ
Farmer Scheme | केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी आणि व्यापाऱ्यांसाठी नवीन योजना सुरु केली असून, याचा फायदा आता शेतकऱ्यांना घरबसल्या घेता येणार आहे. ‘ई-नाम’शी जोडलेल्या शेतकऱ्यांना उत्पादनाविषयी सर्व सुविधा एकाच छताखाली मिळणार आहे. ई-नामच्या माध्यमातून शेतकरी आणि व्यापारी उत्पादनाची खरेदी आणि विक्री करू शकतात. त्याचबरोबर या पोर्टलवर पिकांची ऑनलाइन माहिती मिळणार असून, या साईटवर करोडो शेतकऱ्यांनी आणि व्यापाऱ्यांनी आतापर्यंत नोंदणी केली आहे.
Farmer Scheme | ई-नाम योजनेचे महत्व काय..?
‘ई-नॅशनल ॲग्रिकल्चरल मार्केट’ म्हणजेच e-NAM योजना होय. ही योजना बाजारपेठेत मालाची योग्य विक्री आणि खरेदीची सुविधा उपलब्ध करून देते. तसेच येथे शेतकऱ्यांना पिकाचा योग्य हमीभाव देखील मिळतो. तसेच याद्वारे, प्रत्येक बाजारपेठेत खरेदीदारांकडून गुणवत्तेनुसार आणि बोलीनुसार कृषी उत्पादनाची चाचणी सक्षम करण्यासाठी मूलभूत सुविधा पुरविल्या जात आहेत. (Farmer Scheme)
या योजनेच्या अंतर्गत सर्व राज्यांतील व्यापाऱ्यांना एकच परवाना दिला जाणार असून, हा परवाना सर्व बाजारपेठांमध्ये वैध असणार आहे. या योजनेत आतापर्यंत तब्बल ९० वस्तूंसाठी सामान्य व्यापार गुणवत्ता विकसित करण्यात आली आहे. जर शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना या योजनेचा लाभ घायचा असेल तर, यासाठी काही आवश्यक बाबी पूर्ण कराव्या लागणार आहेत.
Farmer Scheme | शेतकऱ्यांना शासनाकडून ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान
Farmer Scheme | ई-नाम परवाना कसा काढायचा..?
१. या योजनेचा लाभ http://www.enam.gov.in/web या वेबसाइटवर घेता येणार आहे. मात्र, यावर नोंदणी करणे गरजेचे आहे.
२. त्यानंतर शेतकरी पर्याय निवडा आणि APMC निवडा.
३. ईमेल आयडी भरा आणि त्यानंतर लॉगिन करा.
४. नोंदणी केल्यानंतर, दिलेल्या ईमेल आयडीवर तात्पुरता लॉगिन आयडी आणि पासवर्ड शेतकऱ्यांना मिळेल. www.enam.gov.in/web वर जा आणि आयकॉनवर क्लिक करा.
५. त्यानंतर डॅशबोर्डवर शेतकऱ्यांनी लॉगइन करा.
६. एक संदेश दिसेल ज्यामध्ये “एपीएमसीमध्ये नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा” असे लिहिलेले असेल. फ्लॅशिंग लिंकवर क्लिक करा. अद्यतनित करण्यासाठी नोंदणी पृष्ठावर पुनर्निर्देशित होईल.
Farmer Scheme | बागायतदारांसाठी सरकारची नवी तरतूद…
वापरकर्त्यांची केवायसी पूर्ण झाल्यावरच उत्पादनाची खरेदी आणि विक्री केली जाईल. तर, केवायसी करणे वापरकर्त्यांसाठी अनिवार्य आहे. दरम्यान, शेतकऱ्यांना उत्पादनाविषयी समस्या उद्भवू नये. यासाठी केंद्र सरकारचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरु असून, यामुळे ई-नाम या एकाच प्लॅटफॉर्मवर जास्तीत जास्त सेवा प्रदात्यांना आणि शेतकऱ्यांना जोडले जात आहे. ई-नाम पोर्टलवर शेतकऱ्यांना पर्यायांची कमतरता भासू नये, आणि जास्तीत जास्त नफा मिळावा. यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करीत आहे. ई-नामचे डिजिटल इंटिग्रेशन पूर्ण झाल्यानंतरच शेतकरी आणि व्यापारी ई-नाम सेवांचा लाभ घेऊ शकतात. तर, शेतकऱ्यांना घरबसल्या या योजनेचा लाभ घेता येणार आहे. (Farmer Scheme)