Farmer News | वैतागलेल्या शेतकऱ्याने बँक मॅनेजरला चाकूने भोसकले


Farmer News | यंदा पाऊस नाही अन् त्यामुळे पीकही नाही. जे आहे त्याला भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी कर्जाला आणि निसर्गाच्या या लहरीपणाला कंटाळले आहेत. दरम्यान, अशाच एक कर्जाला आणि बँकेच्या टंगळमंगळ प्रक्रियेला कंटाळलेल्या शेतकऱ्याने बँक मॅनेजरवर चाकूने आर केल्याची घटना उघडकीस आली आहे.

राज्यातील शेतकऱ्यांवर यंदा निसर्ग राजा कोपला असून, अनेक शेतकरी हे या परिस्थितीला कंटाळून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत. मात्र, या घटनेत एका शेतकऱ्याने थेट बँक मॅनेजरच्या पोटात चाकू भोसकून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दरम्यान, या घटनेत सुदैवाने बँक मॅनेजरचे बँक मॅनेजर बचवला असून, त्याला तातडीने रुग्णालयात हलवले असून, त्याच्यावर पुढील उपचार सुरु आहेत. तर, या घटनेतील आरोपी शेतकऱ्याला पोलिसांना ताब्यात घेतले असून, या प्रकरणाचा पोलीस सविस्तर तपास करीत आहेत.(Farmer News)

Farmer Protest | शेतकरी आणि मोदी सरकारमधील पेच का सुटत नाही?

ही घटना बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव या शहरात घडली असून, या शेतकऱ्याला त्याच्या बॅंक खात्यातील पैसे काढण्यासाठी तंगवणाऱ्या संबंधित पंजाब नॅशनल बॅंकेच्या शाखा मॅनेजरवर संतापलेल्या शेतकऱ्याने चाकूने पोटात वार केल्याची घटना घडली आहे. तर, या हल्ल्यात संबंधित बँक मॅनेजर गंभीर जखमी झाला आहे.

Farmer News | नेमकं प्रकरण काय..?

अधिक माहितीनुसार, खामगाव तालुक्यातील जळका भडंग येथील किरण गायगोळ हा शेतकरी आपल्या संत गजानन महाराज शेतकरी बचत गटाचे पैसे काढण्यासाठी येथील पंजाब नॅशनल बँकेत गेला होता. या बँकेतून पैसे काढण्यासाठी मॅनेजरकडून दिरंगाई केली जात होती. सकाळी अकरा वाजेपासून हा शेतकरी बँकेत वाट पाहत थांबलेला होता. परंतु, शेतकरी बचत गटाचा मूळ ठराव नसल्याचे कारण देऊन त्याला बँकेतून पैसे काढले जाऊ शकत नाही, असे सांगितले जात होते. त्यामुळे संतापलेल्या या शेतकऱ्याचा राग अनावर झाला व त्याने सोबत असलेला चाकू काढून थेट बँक मॅनेजरवर सपासप वार केले. यावेळी मध्ये पडलेला आणखी एक बॅंक कर्मचारी देखील जखमी झाला आहे. (Farmer News)

Farmers Protest | शेतकऱ्यांवर बळाचा वापर; अश्रुधुराच्या नळकांड्या अन् लाठीचार्ज

म्हणून मॅनेजर विनाकारण देत होता त्रास

या घटनेतील आरोपी शेतकरी किरण गायगोळ याने संबंधित बॅंक मॅनेजरची याआधीही एका प्रकरणात तक्रार केली होती. त्यामुळे या बॅंक मॅनेजरकडून त्याला विनाकारण त्रास दिला जात असल्याचा आरोप या शेतकऱ्याने केला आहे. विनाकारण त्रास देऊन तंगवल्यामुळे रागाच्याभरात शेतकरी किरण गायगोळ याने मॅनेजर शंतनू राऊत याच्या पोटात चाकूने दोन वार केल्यामुळे मॅनेजर राऊत हा गंभीर जखमी झाला. दरम्यान, मॅनेजरला वाचवण्यासाठी या दोघांत पडलेला कर्मचारी अरविंद निंबाळकर हा देखील या घटनेत जखमी झाला आहे. जखमी राऊत याला खामगाव शहरातील सिल्वर सिटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, आरोपी शेतकरी किरण गायगोळला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर, पुढील तपास पोलिस करत आहेत.(Farmer News)