Drought News | दुष्काळावर मात करण्यासाठी ‘या’ योजनेचा प्रभावी पर्याय


Drought News | महाराष्ट्रात यंदा पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने डिसेंबर महिन्यातच राज्यातील अनेक भागात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली. यातच नाशिक जिल्ह्यातील अनेक गावांत आणि वाड्यांमध्ये ऐन थंडीत ट्रॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ आली असून सध्या राज्यातील एकूण २१८ तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळेच राज्य सरकारने राज्यात पाऊस कमी झाल्याने दुष्काळ घोषित केला आहे.

महाराष्ट्रात गेल्या पावसाळ्यात अपेक्षित असा पाऊस झाला नाही त्यामुळे, राज्यात यंदा अनेक शेती उत्पादनावर याचा परिणाम झाला असून सध्या अनेक तांदुळ, गहू तसेच भाजीपाल्याचे भाव तेजीत आहेत. यामुळे राज्य सरकारने महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात हे दुष्काळी जिल्हे म्हणुन जाहीर केले आहेत. केवळ दुष्काळाविरोधात लढण्याच्या घोषणा दिल्याने पाण्याचा प्रश्न सुटणार नाही तर प्रत्येक गावाचा जल आराखडा तयार करून तिथे तलावाची निर्मीती होणे आवश्यक असून आम्ही त्यावर काम करत आहोत, अशी माहिती भूवैज्ञानिक आणि भूजल तज्ज्ञ डॉ. उपेंद्र धोंडे यांनी दिली.

Drought News | राज्यातील प्रत्येक गावाचा जल आराखडा तयार केला तर

दुष्काळ स्थितीवर मात करण्यासाठी पाणलोट स्थितीचे शास्त्रीय दृष्टिकोनातून वर्णन करणारा भूजल आराखडा निर्माण करणं हा सर्वात महत्वाचा टप्पा असून पाणलोट क्षोत्रातील प्रत्येक थेंबाचं मूल्य जाणुन घेत त्याचं योग्य पद्धतीने नियोजन केलं गेलं पाहिजे. राज्यातील प्रत्येक गावाचा जल आराखडा तयार केला तर या परिस्थितीवर मात करता येऊ शकणार आहे, अशी माहिती भूवैज्ञानिक आणि भूजल तज्ज्ञ डॉ. उपेंद्र धोंडे यांनी दिली आहे.