Nashik News | नववर्षाच्या पहिल्या दिवशी नाशकात होणार गांजा लागवड


Nashik News | 7 डिसेंबर रोजी केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतला आणि या निर्णयाने जिल्ह्यातील शेतकरी संघटना मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त करत आहेत. या निर्यातबंदीमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावं लागत आहे. त्यातच नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने विविध पिकांची शेती उद्धवस्त झाली. अशा परिस्थितीत शेतीच्या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असताना सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून दिले असल्याची तीव्र नाराजी जिल्हयातील शेतकरी दर्शवत आहे.

या सगळ्या परिस्थितीमधून मार्ग काढत शेतकरी आपल्या शेतात कांद्याचे उत्पादन घेत होते पण कांदा निर्यातबंदीमुळे कांद्याच्या दरावर फार मोठा परिणाम होत कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात घसरले. आता त्यामुळे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटनेने आज नववर्षाच्या पहिल्या दिवशी शेतांमध्ये गांजा लागवड करण्याचा निर्धार करण्यात आला आहे.

Onion News | ‘शेतकऱ्यांच्या मयतीला चला’; शेतकऱ्यांचा नवीन वर्षात आक्रोश 

नाशिक जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीसह विविध शेतीमालाचे भाव पाडण्याच्या केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे शेतकरी कर्जबाजारी झाले असताना शेतकऱ्यांच्या आत्महत्यांबाबतही केंद्र सरकार असंवेदनशील असल्याचे दिसून आले आहे. या सर्व परिस्थितीकडे राज्य आणि केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी संघटनेने आज रोजी शेतांमध्ये गांजाची लागवड करण्याची ठरविले असून असे शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटनेचे नाशिक जिल्हा उपाध्यक्ष शैलेंद्र कापडणीस यांनी स्पष्ट केलेले आहे. 

Big News | वाढती महागाई पाहता सरकारने केली मोठी घोषणा

Nashik News | नववर्षाच्या पहिल्या दिवशी गांजा लागवड करण्याचा निर्धार

यापूर्वीच नाशिक जिल्ह्यातील शेतकरी अवकाळी पाऊस, वादळ, गारपीट, कीड तसेच रोगांमुळे त्रस्त झालेला असताना त्यात उत्पादनखर्चाच्या तुलनेत अपेक्षित बाजारभाव मिळणे कठीण झाले आहे. जिल्हयातील अनेक बाजार समित्यांमध्येही शेतकऱ्यांची सर्रास लूट केली जाते. ही संपुर्ण स्थिती लक्षात घेता शेतकऱ्यांना कोणी वाली सध्या राहिलेला नसल्याने नाशिकच्या शेतकरी संघटनेने गांजा लागवडीचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट करण्यात आलेले आहे. दरम्यान, शेतकरी संघटनेच्या गांजा लागवड आंदोलनाची धग सरकारपर्यंत पोहोचणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.