State Government | अवकाळीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांसाठी सरकारची मोठी घोषणा


State Government | ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये नाशिक जिल्ह्यासह राज्याच्या काही भागात अवकाळी आणि गारपिटीने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यापुर्वीच यंदा राज्यात पावसाने दडी मारली होती यामुळे राज्यातील अनेक भागात दुष्काळजन्या स्थितीत शेतकऱ्यांनी आपली पिकं घेतली. यातच नोव्हेंबर महिन्यात नाशिक जिल्ह्यात अवकाळीने कांदा, द्राक्ष, डाळिंब अशा अनेक पिकांना मोठा फटका बसला.

दरम्यान, राज्यात अवकाळी आणि गारपिटीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना सरकारने महत करावी अशी मागणी करण्यात येत होती. आता यातच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीनुसार तीन हेक्टरच्या मर्यादित जिरायती शेतीसाठी हेक्टरी 13,600 रुपये तर बागायती शेतीसाठी हेक्टरी 27 हजार रुपये मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच, बहुवार्षिक पिकांच्या नुकसान भरपाईसाठी हेक्टरी तब्बल 36 हजार रुपये मदत करण्याचे निर्देश महसूल आणि वन विभागाने परिपत्रक काढत जारी करण्यात आले आहे.

State Government | या निर्णयामुळे बाधित शेतकऱ्यांना मोठा दिलासा

ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्य़ात अवकाळी पाऊस तसेच गारपीटीने शेती आणि फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आणि या नुकसानीचा आढावा घेऊन मदत देण्याचा निर्णय नोव्हेंबरमध्ये राज्य सरकारने घेतलेला होता. दरम्यान, निर्णयाची अंमलबजावणी न केल्याने शेतकऱ्यांनी सरकार विरोधात रोष व्यक्त केला असता अनेक भागांत शेतकरी रस्त्यावरही उतरले होते. राज्य सरकारने याची दखल घेऊन बाधित शेतकऱ्यांना आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषात वाढ करत तीन हेक्टरच्या मर्यादित मदत देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

यापुर्वी, एसडीआरएफच्या निकषानुसार यापूर्वी 2 हेक्टरच्या मर्यादित मदत केली जात होती. यानंतर महाविकास आघाडी सरकार असताना हे प्रमाण तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत वाढवण्यात आले. नंतर सत्तेत आलेल्या महायुती सरकारने देखील याच निर्णयाच्या धर्तीवर जिरायती शेतीसाठी 8,500 रुपये ऐवजी 13,500 रुपये तर बागायती पिकांसाठी हेक्टरी 17 हजार रुपयांऐवजी 27 हजार रुपये इतकी मदत अवकाळीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे.