Rain Update | शेतकऱ्यांनो काळजी घ्या! नववर्षाची सुरुवात अवकाळीने 


Rain Update | यंदा महाराष्ट्रात अपेक्षित असा पाऊस झाला नाही. त्यामूळे डिसेंबर महिन्यातच राज्याच्या अनेक भागांत दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र नोव्हेंबर महिन्यात अवकाळी पावसाचा फटका शेतीला बसला होता यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आता पुन्हा नवीन वर्षांच्या पहिल्याच आठवड्यात पावसाची शक्यता पुणे हवामान खात्याने वर्तवलेली आहे.

Nashik News | नववर्षाच्या पहिल्या दिवशी नाशकात होणार गांजा लागवड

आजपासून नववर्षाचा प्रारंभ झाला असून नवीन वर्षाची सुरुवात शेतकऱ्यांसाठी चिंता निर्माण करणाऱ्या बातमीने झाली आहे. मागील वर्षभरात अवकाळी पाऊस आणि दुष्काळामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांसमोर आता अगदी नववर्षाच्या स्वागतासाठी पुन्हा अवकाळीचे संकट उभं राहिलं आहे. 

यंदा महाराष्ट्रात पावसाळ्यात अत्यल्प पाऊस आणि नोव्हेंबर मध्ये झालेला अवकाळी आणि गारपीट. यामुळे राज्यासह नाशिक जिल्ह्यातील शेतकरी अगदी हतबल झाला होता. यातच आता नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात राज्यात हलक्या पावसाचा अंदाज पुणे हवामान खात्याने वर्तवला असल्याने शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढली आहे. 

Big News | वाढती महागाई पाहता सरकारने केली मोठी घोषणा

Rain Update | मध्य महाराष्ट्रात गुरुवारपासून पावसाचं आगमन

राज्यात यावर्षी नैसर्गिक हवामानातील बदलामुळे खरीप हंगाम चांगला आला नाही, त्यामुळे शेतकऱ्यांची आशा रब्बी हंगामावर निर्भर होती. मात्र नोव्हेंबर महिन्यात अवकाळी पावसाचा फटका शेतीला बसला आणि त्या पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दरम्यान, उत्तरेकडील थंड वाऱ्याचा परिणामामुळे हा अवकाळी बरसणार असून मध्य महाराष्ट्रात गुरुवारपासून पावसाचं आगमन होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तर या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात येत आहे.