Crop News | त्यासाठी शेतकऱ्यांनी नोंदनी करणे आवश्यक
Crop News | यंदा महाराष्ट्रात तुरीच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. अवकाळी पाऊस आणि धुक्यामुळे तूर पिकांना मोठा फटका बसला आहे. तर बाजारभावानुसार, तूर खरेदीसाठी नोंदणीत देखील घट झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी नोंदणी करणे आवश्यक असून, ही स्थिती छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात बघायला मिळत आहे.
Crop News | तूर खरेदीसाठी शेतकरी कुठे करणार नोंदणी..
तूर खरेदी नोंदणीसाठी राज्य शासनाची ‘पीएसएफ’ योजना आहे. या योजने अंतर्गत बाजारभावानुसार तूर खरेदी करण्यासाठी काही केंद्र उघडली गेली आहे. ही केंद्र छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आणि गंगापूर या दोन ठिकाणी सुरू आहेत. तसेच अन्य ठिकाणी देखील आहेत. तर केंद्र सरकारने शेतकऱ्यांना १३ डिसेंबरपासून ऑनलाइन नोंदणीसाठी आवाहन केले होते. मात्र शेतकऱ्यांनी अजून देखील नोंदणी केलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर नोंदणी करून तूर खरेदी करावा. (Crop News)
Crop Insurance | शेतकऱ्यांना वेळेत विमा मिळत नाही; मनसे पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना पॅड फेकून मारले
आतापर्यंत केवळ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तीन शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे. तर अर्ज ३५ शेतकऱ्यांनी केले होते. राज्य शासनाच्या बाजारभावानुसार तूर खरेदीकरिता प्रत्येक जिल्ह्यातील दर जाहीर करण्यात आले आहेत. त्यात पुणे जिल्ह्यात सर्वात कमी झाले असून, लातूर जिल्ह्यात सर्वाधिक आहे. त्याचबरोबर राज्य शासनाच्या तूर खरेदीकडे शेतकरी वळत नसल्याची स्थिती बघण्यास मिळत आहे.
पुणे : ५ हजार ९४६ रुपये १९ पैसे प्रतिक्विंटल
लातूर : ९७८४ रुपये प्रतिक्विंटल
दरम्यान, शेतकरी तूर विक्रीसाठी ज्या प्रमाणे गरज पडेल, त्याच प्रमाणे तूर खरेदी करत आहेत. तर शेतकऱ्यांना तुरीचे दार वाढतील अशी अशा आहे. तर, शेतकरी तूरी ऐवजी कापूस खरेदी करण्यासाठी जास्त प्राधान्य देत आहेत. शेतकऱ्याला केवळ एक क्विंटल तूर हाती येत आहे. त्यामुळे पिकाला लागलेला खर्चही निघत नसल्याची खंत शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
Agriculture News | ऊस टंचाईमुळे राज्यभरात ऊसाची वाहतूक न करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन
यावेळी पाऊस कमी झाल्यामुळे खरीप हंगामातील मूग, उडीद, सोयाबीन या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर शेतकऱ्यांना तूर पिकाकडून आशा होती. मात्र, तूर उत्पादनात मोठी घट झाली आहे. शेतकऱ्यांना तूर लागवडीचा खर्चही देखील निघत नसल्याने शेतकरी चिंतेत झाले आहेत. अवकाळी पाऊस व सतत पडत असलेल्या धुक्यामुळे तुरीच्या उत्पादनात मोठी घट दिसून येत आहे. (Crop News)