Crop Insurance | शेतकऱ्यांना वेळेत विमा मिळत नाही; मनसे पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना पॅड फेकून मारले


Crop Insurance | सध्या राज्यातील शेतकरी अनेक मुद्द्यांवर आक्रमक झाल्याचं दिसून येत असून यातच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आज शेती विमा प्रकरणावर मनसेचे पदाधिकारी चांगलेच आक्रमक झाले होते. मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी शेती विमा प्रश्नी एसबीआय जनरल इन्शुरन्स ऑफिसात अधिकाऱ्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केलेला आहे.

मनसे अनेक मुद्द्यांवर आपला आवाज उठवत असते. यातच योग्य वेळेत विमा परतावा शेतकऱ्यांना मिळत नाही म्हणून आज मनसेचे पदाधिकारी सबीआय जनरल इन्शुरन्सच्या अंधेरी कार्यालय गेले होते मात्र तिथे एसबीआय जनरल इन्शुरन्स ऑफिसातील अधिकाऱ्यांकडून मनसेच्या पदाधिकाऱ्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. यामुळे संतापलेल्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांवर पॅड फेकून मारल्याची धक्कादायक घटना घडली असून या प्रकारानंतर पोलिसांनी तात्काळ या पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतलं आहे. 

Crop Insurance |…नाही तर हजारो शेतकऱ्यांना घेऊन आंदोलन करणार

यंदा राज्यात अत्यल्प पाऊस झाल्याने राज्यासह लातूर जिल्ह्यात दुष्काळ आहे. यातच दहा दिवसाचा या विमा कंपन्यांना अवधी देण्यात आला असून, जर पिक विमा मिळाले नाही तर हजारो शेतकऱ्यांना घेऊन आंदोलन करणार असल्याचे या वेळी मनसे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष संतोष नागरगोजे म्हणाले आहेत.

राज्यात यंदा पावसाने चांगलीच दडी मारली होती यामुळे राज्यातील शेतकऱ्यांचं खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. राज्यातील 36 पैकी 24 जिल्ह्यात स्थानिक जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून झालेल्या नुकसानीला अनुसरून संबंधित विमा कंपन्यांना काही निर्देष देण्यात आले होते. याप्रमाणे, 25 टक्के अग्रीम पीक विमा देण्याबाबत जिल्हा प्रशासनाच्या स्तरावरून अधिसूचना काढण्यात आलेल्या होत्या. मात्र त्या विरोधात काही खाजगी कंपन्यांनी जिल्हा प्रशासन तसेच विभागीय स्तरावर अपिल करण्यात आले होते.

या दरम्यान, राज्य शासनाच्या वतीने 21 दिवसांच्या पावसाच्या खंडाच्या (ड्राय स्पेल) नियमाला अनुसरून तसेच विविध तांत्रिक बाबींचा विचार करून शेतकऱ्यांचे झालेले नुकसान हे राज्यातील पिक इन्श्युरन्स कंपन्यांच्या पुढे सिद्ध करत या कंपन्यांना पिक विमा देण्यास भाग पाडण्यात आले असल्याचे महाराष्ट्राचे कृषीमंत्री धनंजय मुंडे म्हणाले आहेत.