Farmer Issues | ऊस तोडणीला विलंब, शेतकरी संकटात


Farmer Issues | तोडणीला विलंब झाल्याने, शेतकरी नाराज झाले आहेत.

Farmer Issues | सध्या महाराष्ट्रात सगळीकडे ऊस गळीत हंगाम सुरु आहे. अनेक ठिकाणी उसाच्या दरावरून शेतकरी नाराज असून, ऊसतोडणीला देखील विलंब होत आहेत. त्यामुळे शेतकरी नाराज झाले आहे. त्याशिवाय उसाला तुरे आल्याने शेतकरी हतबल झाल्याचे देखील समोर आले आहे. तर, नांदेड जिल्ह्यात बघायला मिळत आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात लागवड झालेल्या उसाची अद्यापही तोडणी झालेली नसल्याने ऊस उत्पादक शेतकरी नाराज झाले आहेत.

Farmer Issues | नेमकं कारण काय ..?

नांदेड जिल्ह्यात यावर्षी उसाची हजारो हेक्टरवर लागवड झाली आहे. ऊस लागवड करून १५ ते १६ महिन्यांचा कालावधी झाला तरी अजूनही शेतकऱ्यांच्या उसाची तोडणी झालेली नाही. कारखाने स्वतःच्या क्षेत्रातील ऊस दुसऱ्या कारखान्याला नेण्यास मनाई करत आहेत. त्यामुळे ऊस तोडणीला विलंब होत असून, शेतकऱ्यांच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होताना दिसत आहे. कारखान्यांनी उसाला पहिली किंमत २५०० रुपये जाहीर केली होती. मात्र, उसाची तोंडीच झालेली नाही. त्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत.

Farmers Issues | शेतकऱ्यांवर मोदी सरकारचा ‘हा’ दुहेरी आघात…!

ऊस वेळेत गेला तर शेतकऱ्यांना पैसे वेळेवर कामाला येतील. मात्र, शेतकऱ्यांनी ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात उसाची लागवड केलेली होती. अशा शेतकऱ्यांचा ऊसही शेतातच तोडणीसाठी अजून देखील पडून आहे. ऊसतोडणी एक महिना उशिराने सुरू झाली आणि ऊस तोडणीसाठी टोळ्यांची कमरता देखील भासत आहे. तर एकाचवेळी अनेक शेतकऱ्यांचा ऊसतोडणीला आल्याने अजूनही बहुतांश शेतकऱ्यांचा ऊस कारखान्यांमध्ये नेलाच नाही. त्यामुळे शेतकऱ्यासमोर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. (Farmer Issues)

इतर जिल्ह्यात काही कारखाने आणि गूळ कारखाने नगदी पैसे देऊन ऊस खरेदी करण्यास तयार आहेत. जिल्ह्यासह विभागात ऊस तोडणी करणाऱ्या टोळ्यांची कमतरता भासत आहे. ऊसतोडणीला येऊन सहा महिन्यांचा कालावधी लोटले आहे. तरी अजूनही शेतकऱ्यांची ऊस तोडणी झालेली नाही. तसेच, ऊस तोडणीला विलंब झाल्याने शेतकऱ्याचे नुकसान होत आहे.

त्याचबरोबर उसाच्या वजनात घट होणार असून, पिकाचे नियोजन विस्कळीत झाले आहे. अनेक शेतकरी उसाचे पीक काढले की त्यानंतर गहू आणि इतर कमी कालावधीच्या पिकाचे उत्पादन घेतात. मात्र यामुळे आता अडचणी निर्माण झाल्या आहेत. दुष्काळी तालुक्यात उसाचे क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली आहे.

Farmers Scheme | आता शेतमालाच्या कॅरेटवर सरकार देणार बंपर सबसिडी

अनेक शेतकरी उसाच्या शेतीकडे वळाले आहेत. यामुळे कारखान्यांवर उसतोडणीचा ताण आला आहे. तसेच कारखाने आर्थिक संकटांचा सामना देखील करत आहेत. ऊस देण्यासाठी शेतकरी टाळाटाळ करत आहेत. यामुळे ज्या कारखान्यांची परिस्थिती चांगली आहे, त्याच कारखान्यावर उसतोडणीचा ताण वाढला आला आहे. (Farmer Issues)