Cotton News | आंतरराष्ट्रीय बाजारात आज ‘या’ पिकाची मागणी वाढली
Cotton News | आंतरराष्ट्रीय बाजारात आज कापसाच्या भावात वाढ झाली आहे. कापसाने आंतरराष्ट्रीय बाजारात ८५.५० सेंट प्रतिपाऊंडचा भाव आहे. कालच्या तुलनेत आज कापसाचे भाव वाढले आहेत. तर, देशातील कापूस भावांमध्येही सुधारणा झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाला चांगला दर मिळत आहे. मात्र, हाच भाव पुढे कायम राहील का? असा सवाल शेतकऱ्यांना पडत आहे. सरकारने जाहीर केलेला कापसाचा भाव शेतकऱ्यांच्या अपेक्षेपेक्षा कमी भावाने विक्री होत आहे.
देशभरासह महाराष्ट्रतही कापूस पिकाचे मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन घेतले जाते. मराठवाडा, विदर्भ आणि खान्देश या विभागात कापूस पिकावरच अर्थकारण अवलंबून आहे. यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने कापूस पिकामध्ये उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. याच कारणाने कापूस दहा हजार पार जाईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती.
Cotton News | देशात यंदा कापूस उत्पादन होणार कमी
Cotton News | कसे होते कापसाचे दर..?
यापूर्वी आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव वाढले नव्हते. त्यामुळे शेतकरी निराश झाले होते. शेतकऱ्यांनी कष्टाने लावलेल्या कापसाला योग्य भाव मिळत नव्हता. परंतु आता कापसाला आंतरराष्टीय बाजारात चांगला भाव मिळत आहे. गेल्या वर्षीच्या डिसेंबर मध्ये देशात ४ लाख गाठी कापूस आयात झाल्या तर ५ लाख गाठींची निर्यात झाली होती. यावर्षीच्या हंगाम सुरुवातीपासूनच देशातील कापसाचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारातील भावापेक्षा कमी असल्याचे दिसून आले आहे. (Cotton News)
तसेच शेतकऱ्यांनी विलंब न करता बाजारात शेतमालाची विक्री करावी. तर शेतकऱ्यांनी चांगला कापूस ७५०० हजार रुपये क्विंटल च्या कमी विकू नये. असे आवाहन शेतकऱ्यांना तज्ज्ञांनी केले आहे. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाचे भाव वाढत असून, देशांमध्ये भाव कधी वाढणार हा प्रश्न आता शेतकऱ्यांपुढे उभा राहिला आहे. आंतरराष्टीय कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाने (सीएआय) जाहीर केलेल्या अंदाजानुसार, आता कापूस निर्यात आयातीपेक्षा जास्त दिसत आहे. त्यामुळे याचा फायदा देखील होत आहे.
Onion Breaking | विंचूर बाजारसमितीत शेतकऱ्यांनी केले कांदा लिलाव बंद!
केंद्र सरकारने २०२३ आणि २४ च्या हंगामासाठी मध्यम धाग्याच्या कापसाला ६ हजार ६२० रुपये आणि लांब धाग्याच्या कापसाला ७ हजार २० रुपये प्रतिक्विन्टल हमीभाव जाहीर केला आहे. सध्या महाराष्ट्रात कापसाला सरासरी ६ हजार ५०० ते ६ हजार ८०० रुपये प्रतिक्विन्टल भाव मिळत आहे. तर देशातील बाजारपेठांमध्ये कापूस दरात नरमाई दिसून येत आहे. आता कापसाच्या लागवडीचा खर्च देखील निघत असल्याने, शेतकरी दु:खी झाले आहेत. (Cotton News)