तनुजा शिंदे : Budget 2024 | आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. हा शेवटचा अर्थसंकल्प होता. त्यामुळे या अर्थसंकल्पाकडून सामान्य नगरिकांना आणि शेतकऱ्यांना खूप अपेक्षा होत्या. मात्र, यात विशेष अशी काहीही घोषणा करण्यात आलेली नाही. विशेषतः या अर्थसंकल्पात केंद्राने लादलेली कांदा निर्यात बंदी हटवली जावी अशी अपेक्षा होती. मात्र, यावर काहीही निर्णय घेण्यात आला नाही. दरम्यान, याचे पडसाद आता नाशिकमध्ये उमटत असून यावरून आता शेतकरी आक्रमक झाल्याचे दिसत आहे.(Budget 2024)
देशातील कृषी क्षेत्राचा विकासदर हा ४ टक्क्यांवरुन घसरुन १.८ टक्क्यांवर आला असून, निदान ही परिस्थिती बघून तरी आजच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी काही उपाययोजना केल्या जातील अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र, आज अशा कोणत्याही नव्या उपाययोजनांची घोषणा करण्यात आलेली नाही. यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी आजही निराशाच पडली आहे.
Onion News | कांद्याला हमीभाव न मिळाल्यास…; शेतकऱ्यांचा इशारा
जिल्ह्यात आत्महत्यांचे प्रमाण वाढले
केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणामुळे देशात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहेत. राज्यासह नशिक जिल्ह्यात दिवसेंदिवस शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहेत. केवळ शेतकऱ्यांच्याच नाहीतर शेतमजूर व ग्रामीण भागातील बेरोजगार तरुणांच्या आत्महत्यांमध्येही गेल्या काही काळांपासून मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. कांद्याबाबतच्या सरकारच्या या धरपकडीच्या धोरणामुळे कांदा उत्पादकांमध्ये मोठी निराशा पसरली असून, कांदा निर्यात बंदिपूर्वी जो कांदा ४ हजारांच्या पार होता. यामुळे सधा उत्पादनच खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. (Budget 2024)
Onion News | शेतकरी संतापले; लासलगावमध्ये कांदा लिलाव बंद
Budget 2024 | शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्याची संधी गमावली
तो आता थेट हजारांवर येऊन पोहोचला आहे. यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी काही दिवसांपूर्वी लासलगाव बाजार समितीत कांदा लिलाव बंद पाडले होते. शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्याची ही चांगली संधी सरकारकडे होती. मात्र, याबाबत कोणताही निर्णय न घेऊन सरकारने कांदा उत्पादकांचा आणखी रोष ओढावून घेतला आहे. दरम्यान, सरकारच्या या सावध भूमिकेवर नाशिकच्या शेतकऱ्यांनी आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. (Budget 2024)
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या की, आमच्या सत्ताकाळात देशातील जनतेचे आर्थिक उत्पन्न वाढले. परंतु, त्या तुलनेत देशात महागाई वाढली नाही. म्हणजे सरकारने महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी शेतकऱ्यांचा कांदा, टोमॅटो, सोयाबीन, कापूस या सर्वच शेतमालाचे भाव पाडले हे सिद्ध होत आहे. कांद्यासह विविध शेतमालावर निर्यातबंदी करून शेतकऱ्यांचे मागील दहा वर्षात लाखो कोटींचे उत्पन्न बुडवल्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत. आजच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना सरकसकट कर्जमाफी जाहीर करण्याची गरज होती. शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न दुप्पट करू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही घोषणा फसवीच निघाली.
- भारत दिघोळे (अध्यक्ष – महाराष्ट्र कांदा उत्पादक संघटना)