Bhendval Ghat Mandni | अवकाळी पाऊस अधिक; काय आहे भेंडवळच्या घट मांडणीचा अंदाज


Bhendval Ghat Mandni | महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील प्रसिद्ध अशा भेंडवळच्या घट मांडणीचे (Bhendval Ghat Mandni) निष्कर्ष आज जाहीर केले असून, या भाकितानुसार यावर्षी पीक परिस्थिती ही सर्वसाधारणच असेल. तर पाऊसदेखील सर्वसाधारण असून, पावसाळ्यापेक्षा अवकाळी पाऊस जास्त प्रमाणात होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 

Bhendval Ghat Mandni | काय आहे भेंडवळची घट मांडणी..?

बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद या तालुक्यात भेंडवळ हे एक गाव आहे. येथे दरवर्षी अक्षय तृतीयेच्या दिवशी घटमांडणी केली जाते. या घट मांडणीला ‘भेंडवळचं भाकीत’ (Bhendval Ghat Mandni) असं म्हटलं जातं. दरम्यान, आज ही भविष्यवाणी करण्यात आली.

अक्षय्य तृतीयेला (Akshay Trutiya) सायंकाळी गावाबाहेरील शेतात या घटाची आखणी करुन त्यात  पृथ्वीचे प्रतिकात्मक स्वरुप म्हणून पुरी समुद्राचं प्रतिकात्मक स्वरुप म्हणून घागर व त्यावर पापड, वडा आणि पावसाचे प्रतिक म्हणून मातीचे ढेकळे, वडा, पानसुपारी याची मांडणी केली जाते.

Maharashtra Weather | राज्यात ‘या’ भागांत अवकाळी बरसणार; तर, ‘या’ भागांत उष्णता वाढणार

तसेच त्यात घागर, मातीचे ढेकळे, पापड, पुरी, सांडोळी, पान आणि त्यावर सुपारी, गहू, ज्वारी, तूर, उडीद, मूग, हरभरा, जवस, तीळ बाजरी, तांदूळ, अंबाडी, वाटाणा, सरकी, मसूर, करडी असे १८ धान्य आणि मध्यभागी एक गोल खड्डा करुन त्यात मटकी ठेवली जाते. रात्रभर यात ज्या काही हालचाली होतात. त्याचे निरीक्षण करुन त्यावरुन सकाळी अंदाज वर्तविला जातो.(Bhendval Ghat Mandni)

शेतकऱ्यांसाठी हे वर्ष कसे असेल..?

दरम्यान, आज करण्यात आलेल्या भेंडवळच्या घट मांडणीच्या (Bhendval Ghat Mandni) भाकितानुसार, सुरुवातीचे दोन महिने पावसाळा कमी असेल. तर नंतरचे दोन महिने भरपूर पाऊस राहिल. पावसाळ्यापेक्षा अवकाळी पाऊस अधिक राहील. त्यामुळे शेतकऱ्यांचं पिकांचं मोठं नुकसान होऊ शकतं. यावर्षी पाऊस चांगला होईल.

मात्र, तरीही खरिपाची पिकं सर्वसाधारण असतील. तर रब्बीच्या हंगामात गव्हाचे पिक चांगले येईल. याशिवाय काही पिकांवर रोगराईचा प्रभाव होऊ शकतो. जून, जुलै महिने पाऊस कमी असेल. तर, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात चांगला पाऊस पडेल. पावसाळ्याच्या पहिल्या महिन्यात पाऊस लहरी स्वरूपाचा असेल. तर, तिसऱ्या महिन्यात सर्वत्र चांगला पाऊस पडेल.

Weather Update | सावधान..! आता वेस्टर्न डिस्टर्बन्सचाही धोका उद्भवणार..?

देशाचा राजा कायम राहील 

इतर देशांपासून देशाला धोका नसेल. तर, देशाचा राजा कायम असेल. चौथ्या महिन्यातही पावसाळा कायम राहील. यावेळी उपस्थितांनी या घटमांडणीतून मागील वर्षी जे भाकित केलं होतं ते जवळपास ९० टक्के खरं झाल्याचे सांगितले.