Swabhimani Shetkari | प्रदेशाध्यक्षाचा पोरगा बाजारात भाजी विकतो..


वैभव पगार – प्रतिनिधी : म्हेळूस्के | “भिंती नसलेल्या जगाच्या शाळेत अनुभवाचे पुस्तक वाचता आले पाहिजे”, असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष (Swabhimani Shetkari) प्रा. संदीप जगताप यांनी व्यक्त केले. मात्र, त्यांचाच मुलगा बाजारात भाजी विकतोय. म्हणजे शेतकऱ्यांच्या मुलांना व्यवहार ज्ञान हे लवकर कळाले पाहिजे, हा त्यांचा हेतू असून यावर बोलतांना ते पुढे म्हणाले की, “शाहूला उन्हाळी सुट्टी आहे. वावरातल्या शतावरीचे पीक आम्ही रोज दादर मार्केटला पाठवतो. परवा शाहू म्हणाला पप्पा मी शतावरी पिंपळगाव बाजारात विकून बघतो. तेव्हा क्षणभर मला हसू आलं. बाजारात कशी भाजी विकणार हा..? थोडेसे नुकसान होईल पण याला अनुभव घेऊ द्या.

Nashik Onion | खाजगी जागांवर लिलाव सुरू केल्याने जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थांचे धाबे दणाणले

Swabhimani Shetkari | त्याने मिळवलेले पैसे ५० खोक्यांपेक्षा मला जास्त वाटले

हा विचार करून मी होकार दिला. पहिल्या दिवशी शतावरी फुलांची १०५ रुपयांची व काल १७० रुपयांची भाजी त्याने बाजारात विकली. त्याने मिळवलेले हे पैसे ५० खोक्यांपेक्षा मला निश्चित जास्त वाटले. आज पण बाजारात जायची जोरदार तयारी सुरू आहे. अर्थात मिळालेले सगळे पैसे आम्ही त्यालाच दिले आहे. पुढे ही देणार आहोत. त्या पैशाचे तो काय करतो हे भविष्यात बघु. पण तीन तास बाजारात बसण्याचा अनुभव मात्र तो रोज घेत आहे.(Swabhimani Shetkari)

Eknath Shinde | मुख्यमंत्र्यांनी दिला शब्द; या शेतकऱ्यांना मिळणार प्रोत्साहनपर अनुदान

काही कौतुक करतात, तर काही कुचक्या भाषेत बोलतात

ते देखील त्याच्या इच्छेने. काही लोक त्याला ओळखतात. प्रदेशाध्यक्षाचा पोरगा बाजारात भाजी विकतो, याचे काही कौतुक करतात. तर काही कुचक्या भाषेत बोलतात, असं तो मला सांगतो. मी त्याला म्हटलं कौतुकाने हुरळून जायचं नाही अन् कूचक्या बोलण्याने दुःखीही व्हायचं नाही. आपलं काम आपण करायचं अन् करतच रहायचं.