Ajit Pawar | लोकसभेला दिलेल्या झटक्याने पार कंबर मोडली; माफी मागत कांदा उत्पादकांना दादांचा वादा


नाशिक : लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसला. विशेषत: कांदा पट्ट्यात महायुतीला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. कांदा निर्यात बंदी, अतिरिक्त कांदा निर्यात शुल्क, कांदा उत्पादकांच्या (Onion Farmers) बाबतीतील धरसोडीचे धोरण यामुळे कांदा उत्पादक शेतकरी चांगलेच नाराज होते आणि त्यांची आपली नाराजी लोकसभा निवडणुकीत मतपेटीत दाखवून दिली. याची कबुली महायुतीचे पराभूत उमेदवार, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि आज निफाड येथील जाहीर सभेत अजित पवारांनीही  (Ajit Pawar) दिली. 

Ajit Pawar | काहीही करा पण कांदा निर्यात बंदी करू नका

काही दिवसांपूर्वीही भर कार्यक्रमात अजित पवारांनी पीयूष गोयल यांना विनंती केली होती की, “काहीही करा पण कांदा निर्यात बंदी करू नका”. यानंतर आता अजित पवार हे चार दिवस नाशिकमध्ये असून, जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने ते आज निफाड मतदार संघात बोलत होते. यावेळी त्यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांची जाहीर माफी मागत यापुढे कांदा निर्यात बंदी होऊ देणार नाही असे आश्वासन दिले आहे. 

Ajit Pawar |  ‘…तर पवारांची औलाद नाही’ म्हणत शेतकऱ्यांना ‘दादांचा वादा’

लोकसभेला जो झटका दिला त्याने पार कंबर मोडली

“शेतकऱ्यांनी आता यापुढे बीज बिल भरायचे नाही आणि मागचे थकलेलेही वीज बिल द्यायचे नाही. केंद्रात सरकारही आमच्या विचारांचे असून, आता कांदा निर्यात बंदही करायची नाही. लोकसभेला जो झटका दिला तो चांगला जोरात लागला. आमची पार कंबर मोडली, आमची चूक झाली आम्हाला माफ करा. कारण जो काम करतो तोच चुकतो”, असे यावेळी अजित पवार म्हणाले. जनसन्मान यात्रेच्या दुसऱ्या दिवशी आज अजित पवार आमदार दिलीप बनकरांच्या निफाड विधनसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी आयोजित शेतकरी मेळाव्यात त्यांनी हे वक्तव्य केले आहे. 

योजना सुरू राहण्यासाठी तुम्ही आमचे बटण दाबले पाहिजे

आम्हाला लाँग टर्मचे राजकारण करायचे आहे, उद्या योजनेचा लाभ मिळाला नाही. तर या महिला भगिनी मला जाब विचारतील. विरोधकांच्या खोट्या नेरेटिव्हला बळी पडू नका. ही 45 हजार कोटी रुपयांची योजना असून, ही योजना कायमस्वरूपी चालू ठेवणार आहोत. ही योजना सुरू राहण्यासाठी आम्हाला पुढे जायला पाहिजे आणि तुम्ही आमचे बटण दाबले पाहिजे”. 

Nashik Grapes | ‘फक्त १५ मिनिटांत होत्याचं नव्हतं झालं’; निफाडमध्ये शेतकऱ्याने द्राक्ष बागेवर फिरवली कुऱ्हाड