Ajit Pawar |  ‘…तर पवारांची औलाद नाही’ म्हणत शेतकऱ्यांना ‘दादांचा वादा’


नाशिक :  उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत कळवण सुरगाणाचे (Kalwan Surgana) आमदार नितीन पवार यांच्या मतदार संघात विकासकामांच्या उद्घाटन आणि शेतकरी मेळावा पार पडला. या मेळाव्यात अजित पवारांची डायलॉगबाजी पहायला मिळाली. लोकसभेला नाशिकमध्ये शेतकरी प्रश्नाचा फटका बसला त्यामुळे शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेऊन अजित पवारांनी कालची सभा गाजवली. नाशिक हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असून, हा गड अबाधित ठेवण्यासाठी अजित पवारांकडून जोरदार प्रयत्न सुरू आहे. 

मी सर्व देवांना प्रार्थना करतो की

“शेतकऱ्यांनो मोफत वीज वापरा, लाईट बिल देऊ नका. पुढील 5 वर्ष जर तुम्हाला मोफत वीज दिली नाही. तर पवारांची औलाद सांगणार नाही”, असा शब्द यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी शेतकऱ्यांना दिला. “आता पावसाचे दिवस आहेत. मात्र, अजूनही काही धरणं भरायची बाकी असल्याने आपल्याला पावसाची गरज आहे. मी सर्व देवांना प्रार्थना करतो की, सर्व धरणं तुडुंब भरावी, समाधानाचे वातावरण शेतकऱ्यांमध्ये येऊ दे मागे पांडुरंगालाही मी यासाठी प्रार्थना केली. माझी नाशिककरांना विनंती आहे की, अनेक द्राक्ष व्यापारी शेतकऱ्यांचे पैसे बुडवतात. त्यामुळे तुम्ही सह्याद्री सारख्या काही संस्था आहेत त्यांच्याकडे तुमची द्राक्ष पीकं द्या.”

Budget 2024 | 1.52 लाख कोटींपैकी कांदा उत्पादकांसाठी काहीच नाही; शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच

Ajit Pawar | महायुती का गेले..?; अजित पवारांचे स्पष्टीकरण 

माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात ही पवार साहेबांना दैवत मानून झाली आहे. गेली अडीच वर्ष शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचे सरकार होते. मात्र, अडीच वर्षांनी ते सरकार पडले. त्यामुळे जर विकास झाला नाहीतर आमच्या मतदार संघात काय उत्तर देणार? असा आमदारांचा प्रश्न होता. मी वरिष्ठांना बोललो की, जर शिवसेना चालतेय तर भाजप का नाही..? ते काही मंत्रिपददेखील देत आहेत. यामुळे वेगवेगळ्या समाज घटकांनाही आपल्याला संधी देता येईल. मी हे सर्व काही माझ्या करता नाही केले, असे स्पष्टीकरणही यावली अजित पवारांनी दिले.  

कांदा प्रश्न जिव्हाळ्याचा

मी येथील सप्तश्रृंगी गडाच्या (Saptshrungi gad) विकासासाठी काहीही कमी पडू देणार नाही. नाशिक जिल्हा बँक ही अडचणीत आली असल्याने शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळत नाहीये. त्यामुळे त्यांना सावकाराकडे जाण्याची वेळ शेतकऱ्यांना येऊ नये, म्हणून आम्ही अनेक योजना आणल्या. नाशिक, पुणे, सोलापूर, नगर या जिल्ह्यात कांदा प्रश्न जिव्हाळ्याचा असल्याने केंद्रात जाऊन कांद्यावरील 40 टक्के निर्यात शुल्क काढून टाका आणि निर्यात बंदी काढून टाकण्याची मागणी केली आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांनाही योग्य मोबदला हवा आहे. दुधात कोणी भेसळ केल्यास त्याला मोक्का लाऊन तुरुंगात डांबणार आहे. भेसळीमुळे लोकांना कॅन्सर होत आहेत.

Union Budget 2024 | शेतकऱ्यांना अर्थसंकल्पात काय हवं..?; शेतकरी नेत्यांच्या मागण्या काय..?