AI Technology | महाराष्ट्रातील शेतकऱ्याची कमाल; प्रथमच AI तंत्रज्ञानाने पिकवला भाजीपाला


AI Technology | सध्या देशात शेती आधूनिकीकरणावर भर दिला जात असून पारंपारीक शेतीबारोबरच देशात शेती तांत्रकीकरणाचा प्रसार सरकारकडून सातत्याने केला जात आहे. यातच देशातील शेती आधूनिकीकरण वाढविण्यासाठी सरकार कृषी यांत्रिकीकरण अशा प्रकारच्या अनेक योजना राबवत आहेत. दरम्यान, सध्या प्रत्येक क्षेत्रात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI)चा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याचं पहायला मिळत असून विशेषत: डीपफेक व्हिडिओमुळे आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI)ला आणखी प्रसिद्धी मिळाली.

आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) हे तंत्रज्ञान मनोरंजन क्षेत्रामुळे चांगलेच प्रचलित झाले मात्र आता याबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. प्रथमतः महाराष्ट्रातील बारामती जिल्ह्यात उस या पिकाबरोबरच भेंडी, टोमॅटो, मिरची, टरबूज, भोपळा, फुले, कोबी ही पिके कृत्रिम बुद्धिमत्तेच्या म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) या तंत्रज्ञानाने घेण्यात आली आहेत.

AI Technology | AI तंत्रज्ञानाने केलेला प्रयोग यशस्वी

महाराष्ट्रातील राजकीय दृष्ट्या कायम चर्चेत असणारा जिल्हा म्हणजेच बारामती जिल्हा मात्र हाच जिल्हा सध्या वेगळ्या कारणाने चर्चेत येऊ लागला आहे. बारामती जिल्ह्यात पहिल्यांदाच शेतीत आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) या तंत्रज्ञानाने केलेला प्रयोग यशस्वी झाला असून यामुळे संपुर्ण महाराष्ट्रात सध्या या प्रयोगाची चर्चा होत आहे.

बारामती जिल्ह्यात झालेल्या या प्रयोगात प्रत्येक पिकाचे नियोजन आर्टिफिशियल इंटेलिजन्सने केले जात असून आणि ते पीक व्यवस्थापन कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारेच केले जाते. या प्रयोगाचे परिणामही चांगले आले असून, भेंडीसारखी थंड प्रतिरोधक पिके सध्या चांगल्या स्थितीत उगवताना दिसत आहेत.

AI Technology | भारतासह जगातीलदेखील पहिलाच प्रयोग

याबाबत बोलताना कृषी विज्ञान केंद्राचे तज्ज्ञ म्हणाले की, बारामतीत विविध पिकांमध्ये पहिल्यांदा कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करत उत्पादन घेण्यात आले आहे. शेतीत वापरल्या जाणाऱ्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) या तंत्रज्ञानात विविध प्रकारचे सेन्सर असून, जे पिकांची स्थिती जाणून घेण्यास मदत करतात. यात विशेषतः मातीचे नायट्रोजन, हवेचे तापमान, वाऱ्यातील वेग आणि हवेतील आर्द्रता मोजण्यासाठी तसेच हवेतील रोगांचे सूक्ष्म निरीक्षण करण्यासाठी हे सेन्सर बसवण्यात आले आहेत.

शेतीत करण्यात आलेल्या या कौतुकास्पद प्रयोगामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची मान उंचावली आहे. यामगील महत्त्वाचं कारण म्हणजे बारामती जिल्ह्यात करण्यात आलेला हा प्रयोग भारतासह जगातीलदेखील पहिलाच प्रयोग मानला जात आहे. दरम्यान, विदेशातील प्रसिद्ध ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीनेदेखील शेतीमध्ये AI चा वापर करण्यासाठी पुढाकार घेत असून, बारामती येथील अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट आणि ऑक्सफर्ड विद्यापीठ यांच्यात यासंदर्भात प्रयोग सुरू करण्यात आलेले आहेत.