New Scheme | पीएम किसानच्या लाभार्थ्यांना मिळणार राज्य सरकारच्या ‘या’ योजनेचा लाभ


New Scheme | देशासह महाराष्ट्रात शेतकरी हीतासाठी अनेक योजना राबवल्या जातात. तसेच राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य मिळावे म्हणुन राज्य सरकारने पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या आधारे महाराष्ट्रात नमो शेतकरी योजना सुरू केली असून पीएम किसान योजनेप्रमाणे या योजनेअंतर्गत देखील महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना शेतीसाठी वर्षाला ६,००० रुपये दिले जात आहेत.

महाराष्ट्रात शेतकऱ्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागते आणि या संकटांमुळे कधी कधी शेतकरी टोकाचं पाऊल उचलतात. म्हणुनच शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य मिळावं म्हणुन राज्य सरकारकडून अनेक योजना राबवल्या जात आहेत. दरम्यान, जर तुम्ही प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेत असाल तर आता तुम्ही महाराष्ट्र सरकारच्या नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा लाभ देखील घेऊ शकणार आहात.

New Scheme
New Scheme

New Scheme | एकूणच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वार्षिक १२ हजार रुपये..

भारतात केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना लागू केली असून राज्यात महाराष्ट्र सरकारने नमो शेतकरी योजना लागू केली आहे. आता एकूणच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वार्षिक १२ हजार रुपये आर्थिक सहाय्य मिळणार असून म्हणजेच दर महिन्याला राज्य सरकार एक हजार रुपये थेट रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात येत आहे.

महाराष्ट्रातील शेतकर्‍यांसाठी ही आंनदाची बातमी आहे, कारण राज्यातील शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत वर्षाला ₹6000 मिळत असून, त्याचप्रमाणे आता महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या नमो शेतकरी महा योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वर्षाला ₹6000 मिळणार आहेत. एक चांगली गोष्ट म्हणजे, या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी योजना सोडण्याची गरज नसून तुम्ही या दोन्ही योजनांचा लाभ घेऊ शकणार आहात.

New Scheme |…तर तुम्हाला महाराष्ट्र सरकारच्या या योजनेचा लाभ मिळणार

आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की, नमो शेतकरी या योजनेसाठी नोंदणी कशी करावी? तर तुम्हाला नमो किसान योजनेसाठी वेगळी नोंदणी करण्याची गरज नसून पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेणाऱ्या महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहेत. जर तुम्ही PM किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी असाल तर तुम्हाला महाराष्ट्र सरकारच्या या योजनेचा लाभ मिळणार आहे.