Agro News | कर्नाटकच्या कांद्याची आवक वाढली; दरांमध्ये चढ-उतार??


Agro News | गणेशोत्सवामुळे सर्वच फळभाज्यांच्या मागणीमुळे किलोमागे 20 ते 30 रुपये वाढ झाली आहे. सध्या बाजारात बीन्सची आवक कमी झाल्याने दरात किलोमागे 20 रुपयांची वाढ झाली आहे. त्यातच कोल्हापूरच्या सीमा भागातील बाजारात कर्नाटकातून कांद्यांची नवी आवक सुरू झाली आहे. तर मागणी अधिक असल्याने दरात तेजी असल्याचे पाहायला मिळत आहे. आठवड्याभरापूर्वी फुलांचे दर विक्रमी झाले होते. ते विसर्जनामुळे आवाक्यात आले असून लसणीच्या दरातील तेजी कायम आहे. फळ बाजारात सफरचंदाचे दर थोडे नरमले आहेत.

Agro News | देवळा बाजार समितीच्या आवारात नवीन मका खरेदीचा शुभारंभ

गणेशोत्सवामध्ये शाकाहारावर जास्त भर असल्यामुळे भाजी मंडईत फळभाज्यांना जास्त मागणी आहे. त्यामुळे किलोमागे 20 ते 30 रुपयांचे दर वाढले आहेत. हिरवी मिरची, ढब्बू, दोडका, कारली, गवार यांचे दर वाढल्याने शेतकऱ्यांच्या हातात चांगले पैसे येत असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. तर टोमॅटो, कोबी, दीडगा यांचे दर टिकून असून पंधरवड्यापासून वाढलेले कोथंबिरीचा दर आता उतरले आहेत. 100 पेंढ्यांचा दर हजार रुपयांनी कमी होऊन 3000 वर स्थिरावला आहे. त्यामुळे पेंढीचा दर 50 वरून 30 रुपयांवर आला आहे. पालेभाज्या अद्याप कमीच असल्यामुळे 10 ते 15 रुपये पेंढी असे दर आहेत.

Agro News | अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना निकषांपलीकडे जाऊन मदत करणार धनंजय मुंडेंचं वक्तव्य

कर्नाटकातून कांद्यांची नवीन आवक सुरू

बेळगाव, हुबळी या कर्नाटक जिल्ह्यातून कांद्याची नवीन आवक सुरु झाली असून 4800 हा दर स्थिर असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे. तर क्विंटलचा दर 2500 रुपयांपर्यंत आहे. बटाट्याच्या आकारानुसार भाव असून, लसणाच्या क्विंटल मागे 20 रुपयांनी दर वाढले आहेत. फळबाजारात 100 ते 150 रुपयांपर्यंत दर्जानुसार दर आहेत. सिताफळ, पेरू, चिकू 80 ते 100 रुपये किलो आहेत. तर डाळिंबाचे दर जास्त असून प्रत चांगली नाही. किलोचा भाव 150 ते 200 रुपयांपर्यंत आहे. जनावरांच्या बाजारात सव्वा महिन्यापासून शेळ्या, मेंढ्यांची मागणी घटली असून श्रावण झाल्यामुळे बकऱ्यांना मागणी आहे. 7 ते 20 हजार पर्यंत त्यांचे दर आहेत. (Agro News)