Weather Update | राज्यात पावसाला पोषक हवामान; पुढील 2 दिवसात पावसाच्या सरींचा अंदाज


Weather Update | बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पावसाला पोषक हवामान तयार होत आहे. आज मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. तर इतर राज्यात मुख्यतः उघडिपीसह हलक्या सरींचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

Weather Update | पावसाने घेतली विश्रांती; राज्यात आज पावसाच्या तुरळक सरी

नैऋत्य उत्तर प्रदेश आणि आग्नेय मध्य प्रदेशात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असून गुरुवारी दि. 19 रोजी या प्रणालीची तीव्रता आणखीन ओसरणार आहे. मान्सूनचा आज असलेला कमी दाबाचा पट्टा फिरोजपुर, नर्नुल, पेंद्रा रोड, पुरी ते पूर्व बंगालच्या उपसागरापर्यंत कमी दाबाचे केंद्र सक्रिय आहे. तर हरियाणा आणि उत्तर पंजाबमध्ये चक्राकार वाऱ्यांची स्थिती असेल.

पावसाच्या उघडिपीने तापमानात वाढ

राज्यात पावसाने विश्रांती घेतल्याने कमाल तापमानात वाढ झाली असून बुधवारी दि. 18 च्या सकाळपर्यंत 24 तासांमध्ये अकोला येथे राज्यातील उच्चांकी 34.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर अनेक ठिकाणी तापमान 32 अंशाच्या पुढे गेलेले दिसून आले. राज्यात पावसाने विसावा घेतला असतानाच पावसासाठी पोषक हवामान तयार होत आहे. आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळ ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता असून विदर्भासह उर्वरित राज्यात पावसाची उघडीप राहण्याची शक्यता आहे. तर उद्यापासून 20 तारखेपर्यंत राज्यात पाऊस वाढण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

Weather Update | राज्यात पुढील 72 तासात मुसळधार पाऊस; ‘या’ जिल्ह्यांना बसणार फटका?

राज्यात ‘या’ भागात बरसणार पावसाच्या सरी

आज गुरुवार दि. 19 रोजी राज्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून विजांसह पावसाची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, नंदुरबार, रायगड, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, सातारा, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर या भागात पावसाच्या सरीवर असण्याची शक्यता आहे. (Weather Update)