Nashik News | पावसाच्या भितीने निफाडमध्ये द्राक्ष बागांची फळधारणा छाटणी सुरू


Nashik News | सध्या पावसाने काही काळ विश्रांती घेतल्याने द्राक्ष हंगामासाठी आवश्यक असलेली फळधारणा छाटणीला वेळीच सुरू झाली आहे. पुढे पावसाचा धोका लक्षात घेत आगाप छाटणीला सुरूवात झाली आहे. तर सप्टेंबर अखेरीपर्यंत निफाड तालुक्यातील 50 हजार एकरवरील बागांपैकी 20 टक्के द्राक्ष बागांची छाटणी होण्याची शक्यता आहे.

Agro News | ‘सरकारने योजना भ्रष्टाचार करण्यासाठी काढल्यात का?’; बच्चू कडूंचा सरकारला संतप्त सवाल

मुसळधार पावसाने द्राक्ष वेलींची पानगळ

बहुतेक शेतकऱ्यांनी ऑक्टोबरमध्ये विविध मुहूर्तांत छाटणीचे नियोजन केले असून पावसाने केलेल्या उघडिपेमुळे फळछाटणीसाठी आदिवासी मजूर देखील दाखल झाले आहेत. दरवर्षी सप्टेंबर महिन्याच्या मध्यावर निफाड तालुक्यात द्राक्ष बागांच्या फळधारणा छाटणीची धांदल असते. त्यात महिनाभरात मुसळधार पावसामुळे या भागांमधील द्राक्षवेलींची पानगळ झाली आहेत. तेव्हा आता पानगळ झालेल्या द्राक्षवेलींची छाटणी केल्याशिवाय शेतकऱ्यांकडे दुसरा पर्याय नसून, मोठे क्षेत्र असलेल्या मोठ्या जोखमीने रंगीत वाणांच्या बागेच्या छाटणीचे काम हाती घेतले आहे.

Nashik | नाशिकात यंदा समाधानकारक पाऊस; धरणे तुडुंब भरली

प्रतिकूल हवामानाच्या भीतीने वेळीच छाटणी

आजही गणपती आणि नवरात्रिच्या मुहूर्तावर द्राक्ष बागांची छाटणी करण्याची शेतकऱ्यांची श्रद्धा कायम असून मुहुर्तावर छाटणीच्या झळा शेतकऱ्यांना बसल्या आहेत. त्यामुळे एकाच दिवशी सरसकट छाटणी करण्याचे दुष्परिणाम शेतकऱ्यांनी भोगले आहेत. त्यामध्ये घडबुडवणी, बागेतील वाण काढणे ही कामे एकाच वेळी येतात. त्या कामांसाठी मजुरांकडून शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होते. त्यात प्रतिकूल हवामान एकाच टप्प्यात आल्यास द्राक्षांना द्राक्षबागा ना द्राक्षबागांना रोगांना बळी पडून औषध फवारणी साखरच वाढतो त्याशिवाय द्राक्ष एकाच वेळी बाजारात येत असल्याने बाजार भावाला धोका असतो शेतकरी आता बागांची विभागणी करून आपल्या सोयीने काम करतो. (Nashik News)