Agro News | देवळा बाजार समितीच्या आवारात नवीन मका खरेदीचा शुभारंभ


Agro News | देवळा बाजार समितीच्या आवारात शुक्रवारी दि. १३ रोजी नविन मका खरेदीचा शुभारंभ करण्यात आला. मका खरेदीच्या शुभारंभाच्या पहिल्या दिवशी जास्तीत 2251 ते 2485 रुपये प्रति क्विंटल दराने मक्याची खरेदी करण्यात आली. सावकीचे प्रभाकर देवरे व विठेवाडीचे शेतकरी संतोष आहेर यांनी विक्रीसाठी आणलेला नवीन मका भुसार व्यापारी यादव मुसळे, हर्षल मेतकर यांनी खरेदी केला.

Agro News | अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना निकषांपलीकडे जाऊन मदत करणार धनंजय मुंडेंचं वक्तव्य

देवळ्यात यंदा समाधानकारक पाऊस

देवळा तालुक्यात यावर्षी समाधानकारक पाऊस झाला असून, तालुक्यात एकूण 17 हजार 316 क्षेत्रावर मक्याची पेरणी झाली आहे. लष्करी अळी, करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने उत्पादनात घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. लष्करी अळीवर कृषी विभागाच्या वतीने जनजागृती करण्यात आली होती. मका उत्पादक शेतकऱ्यांनी देवळा बाजार समितीत मका विक्रीसाठी आणावा, असे आवाहन सभापती योगेश आहेर, उपस्थित शिवाजी आहिरे, सचिव माणिक निकम व संचालक मंडळाने केले आहे. (Agro News)