Farmer Pension | केंद्र सरकारच्या ‘या’ योजनेच्या अंतर्गत आता शेतकाऱ्यांनाही पेन्शन मिळणार आहे.
Farmer Pension | नोकरदार वर्गाला त्यांच्या कामाचे वर्ष संपले की, एक ठरावीक रक्कम त्यांना दर महिन्याला दिली जाती. यामुळे त्यांना उतारवयात एक आधार असतो. आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यातही त्यांना कोणावरही अवलंबून रहावे लागत नाही. आतापर्यंत ही पेन्शन फक्त नोकरदारांनाच मिळत होती. मात्र, आता ही पेन्शन शेतकऱ्यांनाही मिळणार आहे.
कष्टकरी वर्ग, मजूर, आणि शेतकरी यांनाही आता पेन्शन मिळते. यासाठी एक विशेष योजना केंद्र सरकारने सुरु केली आहे. त्याआधारे आता शेतकऱ्यांनाही त्यांच्या उतारवयात कोणावर अवलंबून राहावे लागणार नाही. केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी ही पेन्शनची योजना सुरु केली आहे. ‘पंतप्रधान शेतकरी मानधन योजना’ व ‘पंतप्रधान श्रम योगी मानधन योजना’ या दोन योजनांद्वारे शेतकऱ्यांना पेक्षण दिली जाते. या योजनांना ‘किसान पेन्शन योजना’ म्हणूनही ओळखले जाते. या योजनेच्या माध्यमातून अल्पभूधारक शेतकऱ्यांना वयाच्या ६० व्या वर्षानंतर पेन्शनचा लाभ मिळणार आहे.(Farmer Pension)
Farmer Sucide | नशिक जिल्ह्यात यावर्षी किती शेतकऱ्यांचा बळी..?
सविस्तर माहिती
केंद्र शासनातर्फे देशातील शेतकऱ्यांसाठी ‘प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना’ ही ३१ मे २०१९ सुरु करण्यात आली होती. या योजनेच्या अंतर्गत लहान व अल्पभूधारक शेतकऱ्यांना वयाची ६० वर्षे ओलांडल्यानंतर प्रत्येक महिन्याला ३,००० रुपये पेन्शन दिली जाते. तर, एका वर्षात तब्बल ३६,००० रुपये या योजनेतंर्गत शेतकऱ्यांना मिळतात. तसेच या योजनेंतर्गत आतापर्यंत ४ कोटी ९ लाख ७६ हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. ‘नोंदणी केली आहे. ‘भारतीय आयुर्विमा महामंडळा’च्या अंतर्गत ही योजना राबवली जाते.
Farmer Pension | असा घ्या योजनेचा फायदा
केंद्र सरकारतर्फे शेतकऱ्यांना ‘पीएम किसान सम्मान’ या योजनेच्या अंतर्गत प्रत्येक वर्षी तब्बल ६,००० रुपये इतकी रक्कम आर्थिक मदत म्हणून दिली जाते. तर, ‘शेतकरी सन्मान निधी’ या योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात जवळपास दोन हजार रुपये जमा केले जातात. जे शेतकरी या वरील योजनांचा लाभ घेतात. त्यांना या पेन्शनसाठी अर्ज करता येणार आहे. या योजनेत १८ ते ४० वर्षाच्या आतील कोणत्याही शेतकऱ्याला नोंदणी करता येते. या योजनेद्वारे पेन्शनचा लाभ हा फक्त नोंदणी केलेल्या पती आणि पत्नीलाच मिळतो. तसेच पेन्शनची रक्कम ही थेट संबंधित शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा होते.
Farmer News | शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता; शेतमाल विक्रीसाठी नवी पद्धत
‘पंतप्रधान किसान पेन्शन’ या योजनेत आपल्या वयानुसार हप्ता जमा करावा लागतो. ही रक्कम ५५ ते २०० रुपये प्रति महिना इतकीच असते. या योजनेत नोंदणीसाठी फक्त ५५ रुपये जमा करावे लागतात. २० वर्षापर्यंत या हपत्याची रक्कम ही ६१ रुपये आणि ४० व्या वर्षापासून ही रक्कम २०० रुपये प्रति महिना इतकी होते. या योजनेत जितकी रक्कम शेतकरी जमा करतात, तितकीच रक्कम केंद्र सरकारही जमा करत असते.(Farmer Pension)
ही कागदपत्रे आवश्यक
१. २ हेक्टर पर्यंत जमीन असणारेच शेतकरी योजनेसाठी पात्र
२. आधारकार्ड, बँक खात्याची माहिती, संपर्क क्रमांक
३. शेतकऱ्याचा वयाचा दाखला व शेतीचे खासरा पत्र
४. सरकारी बँक, सेवा केंद्रात योजनेची मिळलेली माहिती
५. https://maandhan.in या वेबसाईटवरून सविस्तर माहिती मिळवू शकतात. (Farmer Pension)
(टीप – वरील माहिती ‘एग्रोटेक’ केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत असून, याद्वारे आम्ही कोणताही दावा करत नाही.)