Onion News | शेतकरी संतापले; लासलगावमध्ये कांदा लिलाव बंद


Onion News | कांद्यांच्या दरात लगातार घसरण होत असल्यामुळे शेतकऱ्यांनी लासलगावमध्ये कांदा लिलाव बंद पाडले आहेत.

Onion News | केंद्र सरकारने लागू केलेल्या कांदा निर्यातबंदीमुळे नाशिकमधील सर्वच प्रमुख बाजारपेठांमध्ये कांद्यांच्या दरात घसरण होत असून, यामुळे आता कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून बाजारभावात सातत्याने घसरण होत आहे. दरम्यान, याचे पडसाद आज लासलगाव बाजार समितीत दिसून आले. ‘कांदा निर्यात बंदी उठवावी, कांद्याला दोन हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळावा’, यासाठी शेतकऱ्यांनी आज आक्रमक पवित्रा घेतला. (Onion News)

Onion News | कांदा निर्यात बंदी उठवा…

‘कांदा निर्यात बंदी उठवावी, कांद्याला दोन हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळावा’, अशी मागणी करत लासलगाव बाजार समिती मध्ये शेतक-यांनी कांदा लिलाव बंद पाडले आहेत. यात ‘महाराष्ट्र कांदा उत्पादक संघटने’चे अध्यक्ष भारत दिघोळे आणि उपस्थित शेतकऱ्यांनी केंद्र सरकराचा निषेध नोंदवला. आशिया खंडातील कांद्याची अग्रेसर बाजारपेठ अशी ओळख असलेल्या लासलगाव-विंचूर बाजार समितीत लाल कांद्याला सरासरी १,१०० रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळत असून, तर कांद्याला योग्य दर देण्याची येथील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मागणी आहे.

Onion News | नाशिकमधल्या बाजार समित्यांमध्ये कांद्याचे दर टेकले; असे आहेत दर..?

आता लाल कांद्याची आवक वाढली आहे. मात्र, कांद्याचे दर दिवसेंदिवस घसरत आहेत. एकीकडे शेतकऱ्यांची उन्हाळा कांद्यांची लागवड सुरू आहे. तर दुसरीकडे केंद्र सरकारच्या कांदा निर्यातबंदीच्या निर्णयामुळे कांद्याच्या भावात सातत्याने घसरण होत आहे. कांद्याच्या दरांत सातत्याने घसरण होत असल्यामुळे आणि साधा उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. दरम्यान, याचमुळे लासलगाव येथे आज आक्रमक शेतकऱ्यांनी थेट लिलाव बंद पाडले. निर्यात बंदीपूर्वी चार हजारांवर असणारे कांद्याचे भाव हे आता थेट हजार रुपयांवर येऊन टेकले आहेत. यामुळे शेतकऱ्यांवर रडण्याची वेळ आली आहे. ‘केंद्र सरकारने निर्यातबंदी त्वरित उठवावी’, अशी मागणी आता शेतकरी करीत आहेत. कांद्याचे भाव सतत घसरत असल्याने, शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च देखील निघत नाही.

Onion Export | …नाहीतर गांजा लागवडीची परवानगी द्या; संतप्त शेतकऱ्यांची मागणी

Onion News | कांद्याच्या भावात घसरण..

नाशिक जिल्ह्यातील लाल कांद्यासह गुजरात, राजस्थान आणि मध्य प्रदेशातील कांदाही बाजारात येण्यास सुरवात झाली असून, यामुळे बाजारात लाल कांद्याची आवक वाढली आहे. केंद्र शासनाचे कांद्याबाबतचे धरसोडीचं धोरण तसेच कांदा पीक घेण्यासाठी दिवसेंदिवस वाढत चाललेला खर्च यामुळे शेतकरी आक्रमक झाले असून, आता तरी कांदा निर्यातबंदी उठवावी, अशी मागणी ते करत आहेत. दरम्यान, केंद्र सरकारने निर्यातबंदी न उठवल्यास ठिकठिकाणी आंदोलन करण्याचा इशारा यावेळी त्यांनी दिला. (Onion News)