Farmer Scheme | शेतकऱ्यांना शासनाकडून ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान


Farmer Scheme | ‘महात्मा ज्योतिराव कर्जमुक्ती योजना’, शेतकऱ्यांना लाभ मिळणार

Farmer Scheme | केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी ‘महात्मा ज्योतिराव कर्जमुक्ती योजना’ राबविली जात आहे. या योजनेंतर्गत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाने प्रत्येकी ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देणार असल्याची घोषणा केली होती. तसेच, जिल्ह्यात ६९ हजार शेतकऱ्यांना आतापर्यंत तब्बल २६२ कोटींचे प्रोत्साहन अनुदान वितरीत करण्यात आल्याची माहिती यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांनी दिली आहे.

Farmer Scheme | या वर्षी सरकार शेतकऱ्यांना काय देणार..?

Farmer Scheme | कशी आहे योजना..?

‘महात्मा ज्योतिराव कर्जमुक्ती योजना’ केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी राबवत असून, या योजनेच्या अंतर्गत १ हजार ७७७ कामे केली जात असून, योजनेत जिल्ह्यातील ३१२ गावांचा समावेश करण्यात आला आहे. खरीप हंगामात ५ लाख १८ हजार शेतकऱ्यांनी, तर रब्बीत ८८ हजार शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणीद्वारे पिकांची नोंद केली आहे. इतर मागासवर्गीय व विशेष मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांना घरकुल उपलब्ध होण्यासाठी ‘मोदी आवास योजना’ सुरू करण्यात आली आहे. या योजनेत सर्व लहान तसेच अल्प भूधारक शेतकऱ्यांचे २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ होणार आहेत. (Farmer Scheme)

यवतमाळ येथील समता मैदानात प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्य ध्वजवंदनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याच कार्यक्रमात यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड हे बोलत होते. संजय राठोड हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असून, त्यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनी राष्ट्रध्वज फडकविण्यात आला होता. या कार्यक्रमात यवतमाळचे जिल्हाधिकारी डॅा.पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी डॅा. मैनाक घोष, जिल्हा पोलिस अधीक्षक डॅा.पवन बनसोड, उपवनसंरक्षक धनंजय वायभासे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रकाश राऊत यांच्यासह विभागप्रमुख अधिकारी उपस्थित होते.

Farmer Scheme | बागायतदारांसाठी सरकारची नवी तरतूद…

Farmer Scheme | काय म्हणाले संजय राठोड..?

‘‘जिल्ह्यात जास्तीत जास्त पात्र शेतकऱ्यांना पीककर्ज उपलब्ध करून देण्यासाठी आपण विशेष प्रयत्न केले आहेत. त्यामुळेच यावर्षी आतापर्यंत २ लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना २ हजार १२६ कोटी रुपयांचे पीककर्जाचे वाटप झाले आहे, असे संजय राठोड यावेळी म्हणाले.

पुढे संजय राठोड म्हणले, “पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत केवळ १ रुपयांत शेतकऱ्यांच्या पिकांना संरक्षण उपलब्ध झाले आहे. त्याचबरोबर नैसर्गिक आपत्तीत पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासन मदत देत असून, शेतकऱ्यांसाठी २३८ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. तर, वन्यप्राण्यांपासून शेतकऱ्यांच्या पिकांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी खनिज विकास निधीतून यावर्षी २१ हजार शेतकऱ्यांना सोलर फेन्सिंग साहित्याचे वाटप करण्यात येईल. दरम्यान, पंतप्रधान जनआरोग्य योजनेतून ५ लाखांपर्यंतचे उपचार विनामूल्य केले जात असून, जिल्ह्यात ६ लाख १७ हजार लाभार्थ्यांनी योजनेचे कार्डही काढलेले आहे. (Farmer Scheme)