Onion News | कांदा व्यापाऱ्यांचे हाल कायम; निर्यात मूल्य कमी करूनही लाखो टन कांदा सीमेवरच रखडला


Onion News | केंद्र सरकारकडून कांद्यावरील निर्यात मूल्य हटवण्यात आले असून, निर्यात शुल्क 40% वरून 20% करण्याचा निर्णय दोन दिवसांपूर्वी घेण्यात आला. केंद्र सरकारच्या या निर्णयाचे शेतकरी आणि कांदा व्यापाऱ्यांकडून स्वागत करण्यात आले. परंतु निर्यात मूल्य रद्द झाल्यानंतरही कांदा व्यापारी आणि निर्यातदारांचे हाल कायम असल्याचे चित्र समोर आले आहे. निर्यातीसाठी जाणारा लाखो टन कांदा सीमेवरती पडून राहिला असून मुंबई बंदरातही 300 कंटेनर अडकले आहेत. नाशिक जिल्ह्यातून निर्यातीसाठी जाणारे कांद्याचे ट्रक थांबवण्यात आले आहेत. तर, तांत्रिक कारणामुळे ही समस्या निर्माण झाल्याचे समोर आले आहे. कांदा निर्यात मूल्यासंदर्भातील हा निर्णय सिस्टीम अपडेट झाला नसल्याने निर्यातीसाठी जाणारे कंटेनर बॉर्डरवर अडकले आहेत.

Onion News | ‘या’ भागातील कांदा काढणीला सुरुवात; यंदा तरी कांदा उत्पादकांना हमीभाव मिळणार..?

Onion News | कस्टम विभागाच्या कागदपत्रांमुळे अडचणी

लोकसभा निवडणुकीत राज्यात कांदा प्रश्नाचा महायुतीला जबर फटका बसला. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात मूल्य रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अर्थ मंत्रालयाने 40% असलेले निर्यात शुल्क 20 टक्क्यांवर आणलं. हा निर्णय 14 सप्टेंबर रोजी घेतला गेला आणि त्याची त्वरित अंमलबजावणी करण्यात आली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात कांदा निर्यातीसाठी जाऊ लागला. परंतु बांगलादेश सीमेवर कांद्याचे 100 ट्रक अडकून पडले आहेत. तसेच मुंबई पोर्टवर देखील 300 कंटेनर अडकून पडले आहेत. त्याचबरोबर नाशिकमध्येही निर्यातीसाठी जाणाऱ्या 70 ते 80 गाड्या थांबवल्या आहेत. कांद्याच्या निर्याती संदर्भात निर्णय सिस्टीम अपडेट झाला नसल्याने कस्टम विभागाची कागदपत्रे तयार करण्यास अडचणी येत असल्यामुळे हा कांदा पडून आहे.

कांदा खराब होण्याची भीती

मुंबई बंदरातून कांद्याची निर्यात जहाजामार्गे केली जाते. परंतु हे जहाज निघून गेल्यास कांदा सडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होणार असून नुकसान टाळण्यासाठी केंद्रीय पातळीवरून हस्तक्षेप करण्याची मागणी कांदा निर्यातदारांकडून केली जात आहे. केंद्र सरकारने निर्णय घेण्यापूर्वी सिस्टममध्ये बदल त्या तारखेपासूनच करून घेतले असते तर ही परिस्थिती उद्भवलीच नसती, अशी संतप्त भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

Onion News | अधिवेशनात कांदा गाजला; खासदार भगरेंनी संसदेत मांडल्या कांदा उत्पादकांच्या व्यथा

शेतकऱ्यांकडे कांदा नाही

केंद्र सरकारकडून कांद्यावरील निर्यात मुल्य 550 डॉलर्स करण्यात आले. त्यामुळे कांद्याच्या देशांतर्गत बाजारपेठेत तर वाढ होत आहे. परंतु सध्या शेतकऱ्यांकडे कांदाच शिल्लक नसल्यामुळे शेतकऱ्यांना या निर्णयाचा फायदा नसल्याची भूमिका शेतकऱ्यांनी व्यक्त केली. जेव्हा शेतकऱ्यांकडे कांदा होता. तेव्हा निर्यात बंदी आणि अतिरिक्त निर्यात मूल्य यांसारख्या शासन निर्णयामुळे यामुळे त्यांना तो कवडीमोल भावात विकावा लागला आणि आता कांदा शिल्लक नाही तेव्हा हे निर्णय घेण्यात आल्याची आक्रमक प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केली. (Onion News)