Onion News | ‘या’ भागातील कांदा काढणीला सुरुवात; यंदा तरी कांदा उत्पादकांना हमीभाव मिळणार..?


Onion News | अक्कलकोट तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांनी जवळ जवळ 3953 हेक्टर वर कांद्याची लागवड केली होती. प्रारंभी पेरणीमध्ये लागवड केलेल्या या कांद्याने वेगवेगळ्या अडचणींवर मात करत स्वतःला व शेतकऱ्यांना जीवनदान दिले आहे. मागच्या वर्षी कांद्याचे दर अचानक कमी झाले. ज्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता. त्यामुळे शेतकरी यावर्षी याकडे पाठ दाखवतील असे वाटले होते. परंतु शेतकऱ्यांनी नशीब आजमावत पिकाची लागवड केली. त्याचबरोबर यंदा कांद्याचा भाव वाढल्यामुळे शेतकऱ्यांकडूनही समाधान व्यक्त केले जात आहे.

साताऱ्यामध्ये कृषी विभागाची वागदरी, तडवळ, अक्कलकोट आणि मैदर्गी अशी चार मंडळं आहेत. त्यापैकी तडवळ भागात यावर्षी सर्वाधिक कांदा पिकाची लागवड झाली आहे. त्याचबरोबर शिरवळ, वागदरी, मैदर्गी, सलगर, किनी, चपळगाव, दुधनी, जेऊर, तोळनुर, तडवळ, नागणसूर, करजगी, या मोठमोठ्या गावातील शिवारात मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड करण्यात आली आहे. करपासारख्या रोगांचे संकट यंदा कांदा लागवडीमध्ये शेतकऱ्यांसमोर होते. परंतु योग्य औषधाची फवारणी करून शेतकऱ्यांनी रोगावर मात केली.(Onion News)

Onion News | अधिवेशनात कांदा गाजला; खासदार भगरेंनी संसदेत मांडल्या कांदा उत्पादकांच्या व्यथा

Onion News | कांद्याला कसा मिळतोय दर..?

सध्या किरकोळ बाजारामध्ये कांद्याला 40 ते 50 रुपये प्रतिकिलोचा दर आहे. तर 2500 ते 4200 रुपये प्रति क्विंटल दर आहे. एकट्या तडवळमध्येच जवळ जवळ 1500 हेक्टरमध्ये कांद्याची लागवड करण्यात आली असून सध्या कांद्याला चांगला भाव मिळत आहे. हे दर कायम राहिल्यास यंदा कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सुगीचे दिवस असतील, असे म्हणण्यास हरकत नाही. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी कांदा हे बंपर पीक आहे. मागच्या वर्षी तालुक्यात 4069 तर यावर्षी 4000 हेक्टरवर खरीप कांदा पिकाची लागवड करण्यात आली आहे. त्यातही यावर्षी कांद्यावर करपासारखे रोग काही भागात बळावत होते.

ज्याला शेतकऱ्यांनी औषध फवारणी करून आटोक्यात आणले. मागच्या वर्षी कांद्याला भाव मिळाला नाही. परंतु यावर्षी चांगला भाव मिळेल अशी आशा आहे. सध्या मिळत असलेले दर कायम राहिल्यास यंदा शेतकऱ्यांसाठी कांदा हे बंपर पीक ठरेल व लाखोंचे उत्पन्न मिळवून देईल, असे तालुका कृषी अधिकारी हर्षद निगडे यांनी सांगितले. तर मागच्या वर्षी चांगले दर न मिळाल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले त्यामुळे विक्रीसाठी काही शेतकऱ्यांनी कांदा किरकोळ बाजारात नेला. ज्यामुळे नुकसान काही प्रमाणात टळले. परंतु यावर्षी चांगला दर मिळत आहे, असे महादेव बिराजदार भोसगे या शेतकऱ्याने सांगितले.

Bangladesh Onion Export | ३२ तासानंतर भारत-बांग्लादेश सीमेवर अडकलेले कांद्याचे ट्रक रवाना