Tractor Subsidy Scheme | शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारकडून अनेक लाभदायक योजना राबविल्या जातात. याचा अनेक शेतकऱ्यांना फायदा होतो. मात्र, काही शेतकऱ्यांना उशीराने किंवा अपूर्ण माहिती मिळाल्यामुळे ते या पात्र असूनही योजनांच्या फायद्यांपासून मुकतात. दरम्यान, केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टर खरेदी अनुदानाबाबतची एक बातमी समोर आली होती. यानुसार, शेतकऱ्यांना केंद्र शासन ट्रॅक्टर खरेदीसाठी अनुदान देणार आहे. पीएम किसान ट्रॅक्टर असे या योजनांचे नाव असून, यांतर्गत शेतकऱ्यांना आधुनिक शेती करण्यासाठी प्रोत्साहन केले जाणार होते. तर, जाणून घेऊयात की काय आहे ही योजना…
दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या वृत्तात सांगितले जात आहे की केंद्र सरकारकडून ‘पीएम किसान ट्रॅक्टर’ ही योजना चालवली जात असून, या योजनेअंतर्गत देशातील गरीब शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून ५० टक्के अनुदान दिले जाते. हे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या बँक अकाऊंटमध्ये जमा केले जाते. या वृत्तामुळे शेतकरी संभ्रमात पडले असून, ही बातमी खरी आहे की नाही? असा सवाल उपस्थित केला जात आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात. (Tractor Subsidy Scheme)
Tractor Subsidy | टॅक्टर खरेदीसाठी शेतकऱ्यांना मिळणार ५ लाखांचे अनुदान!
Tractor Subsidy Scheme | बातमी खरी की खोटी..?
मिळालेल्या माहितीनुसार, हे व्हायरल वृत्त पूर्णपणे खोटे असून, अशी कोणतीही योजना राज्य किंवा केंद्र सरकार राबवत नाही. शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून कुठल्याही प्रकारचे अनुदान दिले जात नसून, याद्वारे देशभरातील शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात आहे. प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोकडून आधीच एक चेतावणी जारी करण्यात आली होती. यानुसार असे सांगण्यात आले होते की, अशी कुठलीही ट्रॅक्टर अनुदान योजना सरकारद्वारे सुरू करण्यात आलेली नाही. त्यामुळे पीएम ट्रॅक्टर योजनेशी संबंधित सोशल मिडियावर प्रसारित होत असलेल्या सर्व बातम्या ह्या पूर्णपणे खोट्या आहेत.
Goverment Scheme | केंद्र सरकारच्या या योजनेमुळे होईल वीज माफ; असा करा अर्ज
त्यामुळे शेतकऱ्यांनी अशा कोणत्याही खोट्या वेबसाईटवर किंवा लिंकवर क्लिक न करण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत. केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक उपयोगी योजना राबवते. दरम्यान, ही योजना राबवली जात नाही. मात्र, काही राज्यांमध्ये शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी काही प्रमाणात अनुदान दिले जाते. तसेच ट्रॅक्टर किंवा इत्यादि उपकरणे खरेदी करण्यासाठीही स्वस्त व्याजदरात कर्ज उपलब्ध करून दिले जाते. देशभरातील लाखो शेतकरी अशा योजनांचा लाभ घेत आहेत.(Tractor Subsidy Scheme)