Wheat Price | महाराष्ट्रात ‘या’ पीकाला मिळतोय विक्रमी भाव


Wheat Price |  यावर्षी पावसामुळे जवळपास सर्वच पीकांचे नुकसान झाले असून, पीकांचे उत्पादनही कमी झाले आहे. मात्र, तरीही टोमॅटो, लसून यासारख्या काही पिकांनी शेतकऱ्यांना सुगीचे दिवस दाखवले. दरम्यान, यात आता भर पडली आहे. ती गहू या पीकाची. सध्या राज्यात दिवसेंदिवस गव्हाच्या दरात वाढ होत असून, सद्यस्थितीला गव्हाच्या भावात विक्रमी वाढ झाली आहे. सध्या स्थानिक बाजारात गव्हाला प्रतिक्विंटल २,५०० ते ३,९०० रुपये इतका दर मिळत असून, यामुळे शेतकरी सुखावले आहे. सरकारच्या हमीभावापेक्षा २५ ते ३० टक्के जास्त दराने स्थानिक बाजारात गहू विकला जात आहे. (Wheat Price)

३,४५० रुपये प्रतिक्विंटल

राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये गव्हाला सरासरी ३,४५० रुपये प्रतिक्विंटल असा भाव मिळत असून, सरकारने चालू वर्षात गव्हाचा एमएसपी २,२७५ रुपये इतका ठेवला आहे. देशात अनेक राज्यात सध्या गव्हाची खरेदी सुरु केली असल्याने गव्हाच्या दरात वाढ होत आहे.

Wheat Price | कांद्यानंतर आता सरकार ‘या’ पीकाचे भाव पडणार..?

Wheat Price | राज्यात का वाढताय गव्हाचे दर?

महाराष्ट्रात यंदा मुळातच गव्हाचे उत्पादन हे कमी होते. देशातील एकूण उत्पादनापैकी फक्त 2 टक्के इतकेच गव्हाचे उत्पादन हे यंदा राज्यात झालं आहे. त्यामुळे राज्यात गव्हाच्या किंमतीत वाढ होत आहे. दरम्यान, एमएसपीपेक्षाही सध्या गव्हाचे दर हे अधिक असून, त्यामुळे एमएसपीवर गव्हाची विक्री करण्यापेक्षा स्थानिक बाजारात गव्हाची विक्री करणं हे शेतकऱ्यांना अधिक लाभदायक आहे.

शेतकरी कांद्याची शेती सोडून करताय गव्हाची शेती

दरम्यान, केंद्र सरकारने ८ डिसेंबरपासून लादलेल्या कांदा निर्यात बंदीमुळे आधी ४ हजारांवर असलेल्या कांद्यांचे भाव हे अचानक खाली आले. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला. त्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावला गेला. त्यामुळे अनेक शेतकरी हे कांद्याची शेती सोडून आता गव्हाकडे मोर्चा वळवला आहे. गव्हाला अपेक्षीत दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचा कल हा गव्हाकडे वाढताना दिसत आहे.

Nashik News | पाच तालुक्यांत ‘कृषी भवन’; मंत्री भूसेंच्या पाठपुराव्याने शेतकऱ्यांना दिलासा

…म्हणून घटले गव्हाचे उत्पादन

गेल्या वर्षी पावसाचं प्रमाण कमी असल्यामुळे राज्यातील अनेक भागातील शेतकऱ्यांकडे गव्हाची लागवड करायलाही पाणी नव्हते. दरम्यान जेमतेम पाण्यावर गव्हाची लागवड केली. तर यानंतर गव्हाला हवामानाचा मोठा फटका बसला. त्यामुळे या प्रतिकूल परिस्थितीचा परिणाम गव्हाच्या उत्पादनावर झाला. गव्हाचे उत्पादन घटले असून, सध्या देशात मागणीत जास्त आणि उत्पादन कमी असल्याने गव्हाच्या दरात वाढ झाली आहे. (Wheat Price)