Weather Update | मध्य आणि दक्षिण महाराष्ट्रासह मराठवाड्यात आज पावसाची शक्यता


Weather Update | मॉन्सूनच्या परतीच्या प्रवासात खंड पडला असून राज्यात पावसाने उघडीप दिली आहे. यातच पावसाला पोषक हवामान झाल्याने आज दिनांक 30 सप्टेंबर रोजी दक्षिण कोकण, दक्षिण व मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांसह पावसाचा अंदाज असल्याने हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा दर्शवण्यात आला आहे. तर उर्वरित राज्यातील काही भागांत हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

Weather Update | मॉन्सूनच्या परतीच्या प्रवासात खंड; आज पावसाचा जोर ओसरणार

नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी मंगळवारी दिनांक 24 रोजी राजस्थान आणि गुजरातच्या आणखी काही भागांसह पंजाब आणि हरियाणाच्या काही भागातून परतीचा प्रवास सुरू केला. त्यानंतर मात्र मॉन्सूनची परतीची वाटचाल थबकली आहे. तर नैऋत्य उत्तर प्रदेश आणि परिसरावर समुद्रसपाटीपासून 4.5 किलोमीटर उंचीवर तसेच दक्षिण गुजरात आणि परिसरावर चक्राकार वारे वाहत आहेत. त्यामुळे राज्याच्या कमाल तापमानात वाढ होत असून रविवारी 29 सप्टेंबरच्या सकाळपर्यंत 24 तासांमध्ये ब्रम्हापुरी येथे राज्यातील उच्चांक की 34.4°c तापमानाची नोंद झाली.

Weather News | चक्रीय वाऱ्यांमुळे आज ‘या’ जिल्ह्यांना ‘येलो अलर्ट’ जाहीर

आज या भागात आहे पावसाचा अंदाज

आज दिनांक 30 सप्टेंबर रोजी कोकणातील सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, मराठवाड्यातील बीड, धाराशिव, लातूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून सातारा, नांदेड जिल्ह्यात तुरळ ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात उघडीप असेल तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज असल्याचे हवामान विभागाने वर्तविले आहे. तर सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, बीड, धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यांना विजांसह वादळीवाऱ्याच्या पावसाचा येलो अलर्ट घोषित करण्यात आला आहे. (Weather Update)