Agro News | सरकारकडून तांदूळ निर्यातीवरील निर्बंध शिथिल; निर्यात शुल्कात देखील घट


Agro News | देशांमधील चांगले पाऊसमान आणि पिकाची चांगली परिस्थिती लक्षात घेत केंद्र सरकारकडून तांदूळ निर्यातीवरील निर्बंध कमी करण्यास सुरुवात केली असून केंद्राने आता बिगर बासमती पांढऱ्या तांदळाच्या निर्यातीवरील बंदी मागी घेतली आहे. तसेच, अर्ध उकडलेल्या तांदळाच्या निर्यातीवरील शुल्क 20 टक्क्यांवरून 10 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आली आहे.

Agro News | नाशिकच्या मालेगावात ‘कृषी स्वर्ण समृद्धी’ सप्ताहाचे आयोजन

उत्पादन घटल्याने लावले होते निर्बंध

देशामध्ये मागील हंगामात तांदळाचे उत्पादन घटले होते. त्यामुळे मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी झाला होता. परिणामी सरकारने जुलै 2023 मध्ये बिगर बासमती पांढरा तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली होती. तसेच ऑगस्ट 2023 मध्ये अर्धवकडलेला तांदूळ आणि मिलिंग न केलेला कच्चा तांदूळ निर्यातीवर 20 टक्के शुल्क लावले होते. परंतु सरकारने आता बिगर बासमती पांढऱ्या तांदळाच्या निर्यातीवरील बंदी मागे घेतली असून अर्ध उकडलेल्या तांदळावरील निर्यात शुल्क 20 टक्क्यांवरून 10 टक्क्यांपर्यंत कमी केले आहेत. तसेच ब्राऊन राईस आणि हातसडीच्या पॉलिश न केलेल्या तांदळावरील निर्यात शुल्क देखील कमी करून 10 टक्के करण्यात आले आहेत.

Agro News | परतीच्या पावसानं सोयाबीन पाण्यात

त्याचबरोबर पांढऱ्या तांदळावरील निर्यात शुल्क शून्य करण्यात आला असून खरिपातील नवामाल काही दिवसांमध्ये बाजारात येईल त्यातच निर्यातीवरील बंधने कायम असल्यामुळे निर्यातदार व शेतकऱ्यांमध्ये चिंता होती. मात्र नव्या हंगामातील तांदूळ बाजारात येण्याच्या मुहुर्तावर सरकारने निर्यात बंधने कमी करण्यास सुरुवात केली आहे.

“सरकारकडून बिगर बासमती तांदळाची निर्यात बंदीचा निर्णय मागे घेण्यात आला आहे. हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे. यामुळे फक्त निर्यातदारांना उत्पन्न मिळणार नाही, तर शेतकऱ्यांना फायदा होणार असून खरिपातील पिकाला यामुळे भाव मिळू शकतो.” -सूरज अगरवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी, राईस व्हिला