Agro News | सोयाबीन आणि कापूस उत्पादकांसाठी खुशखबर; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यांवर आज अर्थसहाय्य वितरित


Agro News | राज्य सरकारने मागील वर्षी भाव पडल्याने नुकसान झालेल्या राज्यातील सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये प्रमाणे अर्थसहाय्य देण्याची घोषणा केली होती. या निधीचे आज वितरण थेट शेतकऱ्यांच्या खात्यात करण्यात आले आहे. मुंबई येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ऑनलाईन वितरण प्रणाली द्वारे एका क्लिकवर शेतकऱ्यांना अर्थसहाय्य वितरणाची सुरुवात करण्यात आली.

Agro News | सरकारकडून तांदूळ निर्यातीवरील निर्बंध शिथिल; निर्यात शुल्कात देखील घट

कापूस व सोयाबीन उत्पादकांना 4194 कोटी रुपयांचा निधी जाहिर

त्यादरम्यान, शेतकऱ्यांच्या खात्यावर एका क्लिकवर सुमारे 49 लाख 50 हजार शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये प्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादेत रक्कम वर्ग करण्यात आली आहे. आज सुमारे 2398 कोटी 93 लाख रुपयांची रक्कम वर्ग करण्यात आली असून उर्वरित पात्र शेतकऱ्यांची ई-केवायसी किंवा आधार व बँक खाते जोडणी पूर्ण झाल्यानंतर या शेतकऱ्यांना देखील या अनुदानाचा लाभ मिळणार आहे.

याविषयीची अधिक माहिती अशी की, 2023 च्या खरीप हंगामात एकूण 96 लाख 787 खातेदार शेतकरी हे सोयाबीन व कापूस उत्पादक होते. त्यानुसार त्यांना मदत करण्यासाठी राज्य शासनाच्या कृषी विभागाने एकूण 4 हजार 194 कोटी रुपये इतका निधी प्रणालीवर उपलब्ध करून दिलेला. त्याच पैकी आता 1548 कोटी 34 लाख रुपये कापूस तर 2646 कोटी 34 लाख रुपये सोयाबीनसाठी तरतूद करण्यात आले आहेत.

Agro News | नाशिकच्या मालेगावात ‘कृषी स्वर्ण समृद्धी’ सप्ताहाचे आयोजन

अनुदान वितरणासाठी महायुती द्वारे स्वतंत्र पोर्टल

हे अनुदान स्वतंत्ररित्या वितरित करण्यासाठी लेखाशीर्षासह महाआरटीद्वारे स्वतंत्र पोर्टल तयार करण्यात आले होते. त्यावर शेतकऱ्यांची स्वतःचे संमती पत्र, बँक खाते व आधार इत्यादी माहिती जमा करून ती माहिती जुळवणे आवश्यक असल्याने यासाठी काही कालावधी लागला. परंतु कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार एकूण खात्यांची संख्या ही 63 लाख 64 हजार एवढी असून आज जवळपास 49 लाख 50 हजार शेतकऱ्यांना याद्वारे लाभ दिला गेला आहे. तर उर्वरित शेतकऱ्यांनाही आधार व अन्य माहितीची जशी जुळवणी होत राहील त्याप्रमाणे लाभ दिला जाणार आहे. (Agro News)