Weather Update | राज्यात पुढील 72 तासात मुसळधार पाऊस; ‘या’ जिल्ह्यांना बसणार फटका?


Weather Update | हवामान खात्याने दिलेल्या अहवालानुसार आज शनिवार 30 ऑगस्ट पासून पुढील चार-पाच दिवस महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दबाच्या पट्ट्याची तीव्रता वाढल्यामुळे महाराष्ट्रातील वातावरणात बदल होणार असल्याचे हवामान खात्याच्या अहवालात नमूद केले आहे. विदर्भ, मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर मुंबईसह, उपनगरातही पावसाच्या सरींचा अंदाज वर्तवला गेला आहे. त्याचबरोबर मध्य महाराष्ट्रालाही पावसाचा इशारा देण्यात आला असून घाटमाथ्यावर पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. (Weather Update)

Weather Update | ‘या’ जिल्ह्यांसाठी पुढील काही तास महत्त्वाचे; ‘रेड अलर्ट’ जारी

Weather Update | शेतकऱ्यांना शेतकामे आवरण्याचे आवाहन

सध्या पावसाने विश्रांती जरी घेतली असली तरी बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता वाढल्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे शेत पिकांची लागवड केलेल्या शेतकऱ्यांना महत्त्वाची कामे लवकरात लवकर उरकून घेण्याचा सल्लाही यावेळी हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या 72 तासात राज्यातील अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे.

Maharashtra Weather Update | उत्तर महाराष्ट्रातील ‘या’ भागांत पुढील चार दिवस पाऊस

बंगालसोबतच अरबी समुद्रातही बाष्पयुक्त वाऱ्यांचा वेग वाढला

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. ज्यामुळे 3 सप्टेंबर ते 5 सप्टेंबर या कालावधीत पावसाचा जोर वाढू शकतो. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे लवकरच मध्यभारतात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर सध्या गुजरात किनारपट्टीपासून केरळ किनारपट्टीपर्यंत अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे अरबी समुद्रात येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्याचा वेग वाढवून वारे वारे किनारपट्टीवर धडकण्याचा अंदाज आहे.

तेव्हा राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होणार असल्याची शक्यता आहे. मुंबई उपनगरांसह, विदर्भ आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांनाही पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. तर पुण्यात देखील जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, नंदुरबार, धुळे व जळगाव या जिल्ह्यांना देखील पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. कोकणातील बहुतांश ठिकाणी गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. तर ठाणे पालघर आणि आसपासच्या परिसरात आज दिवसभर ढगाळ वातावरण असणार आहे.(Weather Update)