Weather Forecast | एकाच भागात कुठे खूप पाऊस तर कुठे काहीच नाही, असे का होते..?; वाचा सविस्तर…


माणिकराव खुळे – हवामानशास्त्रज्ञ | एखाद्या गाव, शहरात काही विशिष्ट भागात पाऊस पडतो पण एखाद्या भागात खूप पाऊस पडतो तर, कुठे काहीच नाही. याची काय करणे आहेत..? चला जाणून घेऊयात…

Weather Forecast | वातावरणातील संवहनी क्रियेद्वारे पडणारा पाऊस

एखाद्या गाव, शहरात काही विशिष्ट भागात पडणारा पाऊस म्हणजे, वातावरणातील संवहनी क्रियेद्वारे पडणारा पाऊस होय. यासाठी त्या भागातील भौगोलिक रचना महत्वाची असते. त्या भागावर पडणारी सूर्याची उष्णता हाच महत्वाचा फॅक्टर असतो. सूर्याच्या उष्णतेने जमिनीचा पृष्ठभाग तापून जेव्हा जमिनीने शोषलेल्या पाण्याचे बाष्पभवन होते. त्या पाण्याच्या वाफेचे आकाशात ऊर्ध्वगमन होवून, उंचावरील थंडाव्यातून, पाण्याच्या वाफेचे सांद्रीभवन होवून फक्त त्या मर्यादित क्षेत्रातच पडणारा पाऊस म्हणजे वातावरणातील संवहनी क्रियेद्वारे पडणारा पाऊस होय. 

Maharashtra Weather Update | उत्तर महाराष्ट्रातील ‘या’ भागांत पुढील चार दिवस पाऊस

म्हणून तर हा पाऊस  एखाद्या गाव, शहरात काही विशिष्ट भागात पाऊस पडतो. कुठे ओले तर कुठे सुके असते. समुद्रावरून अतिउंचावर संक्रमणित झालेले बाष्प त्यात मिसळले जाते व त्याचाही आलेल्या बाष्पाशी संयोग होतो. म्हणून तर ह्या पावसाला स्थानिक वातावरणीय ऊर्जेबरोबर समुद्रीय ऊर्जेचा अप्रत्यक्ष संबंध असतो.

साधारण पूर्वमोसमी हंगामातील मार्च ते मे तसेच परतीच्या पाऊस फिरू लागल्यानंतर सप्टेंबर, ऑक्टोबर (उत्तरा, हस्त, चित्रा नक्षत्र ) महिने, मान्सून आगमन व खंडा नंतरच्या काही दिवसातील पाऊस हा अश्या पद्धतीचा पाऊस असतो. ह्या प्रक्रियेतून झालेल्या पावसाचे उदाहरण द्यावयाचे झाले. तर, मागील वर्षी म्हणजे ६ महिन्यापूर्वी १७ डिसेंबर २०२३ रोजी सागरीय किनारपट्टीवरील वातावरणीय परिणामातून एकाकी ऊर्ध्वदिशेने झालेल्या उष्णसंवहनी प्रक्रियेतुन तामिळनाडूतील ‘थुथूकुडी ‘ येथे २४ तासात झालेला ९५ सेमी. पाऊस हे त्याचे उदाहरण होय

.Weather Update | सावधान..! आता वेस्टर्न डिस्टर्बन्सचाही धोका उद्भवणार..?