Viral News | नगरच्या शेतकऱ्याने स्ट्रॉबेरी पिकवून कमावले 8 लाख रुपये!


Viral News | महाराष्ट्रातील अनेक शेतकरी आता पारंपारिक शेती सोडून फळबाग तसेच इतर पिकांकडे आकर्षित होताना दिसत आहेत. दरम्यान, आता अहमदनगर जिल्ह्यातील पाचगणी परिसरातही हा बदल दिसून आला असून येथे स्ट्रॉबेरीची लागवड दिसून येत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने अवघ्या एक एकर २० गुंठे जमिनीवर स्ट्रॉबेरी लागवडीचा यशस्वी प्रयोग करून त्यातून आठ लाख रुपये कमावले आहेत. यामुळे राज्यातील शेतीचा हा आधूनिक प्रयोग यशस्वी ठरला आहे.

महाराष्ट्रात अनौपचारिकपणे एक गुंठा हा १०० चौरस मीटर मानला जातो म्हणजेच या शेतकऱ्याने केवळ एक एकर आणि 2 हजार चौरस मीटर जमिनीवर स्ट्रॉबेरीची लागवड करून हा चमत्कार घडवला आहे. हा शेतकरी म्हणजे शांताराम अशोक देवतरसे. जे पाचगणीतील रहिवासी असून अशोक देवतरसे यांच्याकडे 1 एकर 10 गुंठे जमीन आहे. ते त्यांच्या शेतात सोयाबीन, वाटाणा, ज्वारी, गहू, ऊस यासारखी पारंपरिक पिके घेत असतात. देवतरसे यांचा प्रगतशील शेतीकडे अधिक कल असून सध्या ते जिल्ह्यातील महाबळेश्वर, पाचगणी तसेच परिसरातून स्ट्रॉबेरीची लागवड करतात. यातून त्यांना लाखोंचा नफा होत असून त्यांना पाहून इतर शेतकऱ्यांचाही या लागवडीकडे कल वाढवलेला आहे.

Viral News | पेरणीपासून काढणीपर्यंत अनेक वेळा मजूर मिळत नाही

दरम्यान, नगर जिल्ह्यात प्रतिकूल हवामान असतानाही सोनई शिवारात स्ट्रॉबेरीचे पीक घेण्यात देवतरसे कुटुंबाला यश आले असल्याने त्यांचे सर्व स्तरीतून कौतुक होत आहे. पेरणीपासून काढणीपर्यंत अनेक वेळा मजूर मिळत नसल्याचे देवतरसे सांगतात तसेच आम्ही कधीही स्ट्रॉबेरीचे काम केले नसल्याचे कामगारांचे म्हणणे आहे. त्यामुळे कटिंगपासून ते पॅकेजिंगपर्यंतची सर्व कामे आम्ही घरीच करतो आणि यासाठी कुटुंबातील सदस्य सर्व कामे करतात. देवतरसे यांची पत्नी अर्चना आणि भाऊ संदीप सकाळी स्ट्रॉबेरी कापून पॅक करतात आणि राहुरीच्या बाजारपेठेत आणि छोट्या विक्रेत्यांपर्यंत पोहोचवतात.

देवतरसे यांनी सांगितात की, पुण्यातील रोपवाटिकेत जाऊन 10 हजार रोपे आणली असून ऑक्टोबर ते मार्च या सहा महिन्यांत अहमदनगर जिल्ह्यात स्ट्रॉबेरी फळपिकासाठी पोषक वातावरण असल्याचे त्यांनी सांगितलेले आहे. या सहा महिन्यांत देवतरसे कुटुंबाला अंदाजे सात ते आठ लाख रुपये मिळतात. स्ट्रॉबेरीची किंमत 150 ते 250 रुपयांपर्यंत असून कमी खर्चात जास्त उत्पादन आणि नफा देणारे हे पीक आहे.