Subsidy Alert | शिंदे सरकार देणार बांबू लागवडीसाठी 7 लाखांचे अनुदान


Subsidy Alert | महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी असून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी बांबूची लागवड केल्यास त्यांना हेक्टरी लाखो रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने राज्यात बांबू लागवडीला चालना देण्यासाठी हा खास योजना आखली आहे. बांबू लागवडीमुळे पर्यावरणाला मोठा फायदा होईल, असा शिंदे सरकारचा विश्वास असून याशिवाय शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळेल आणि हवेचा दर्जाही सुधारेल. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांच्या या योजनेमुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाची लाट उसळली आहे.

Subsidy Alert | 10 हजार हेक्टरवर बांबूची लागवड करण्यात येणार

राज्यात 10 हजार हेक्टरवर बांबूची लागवड करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले असून मुंबईत पर्यावरण शाश्वतता शिखर परिषदेचे उद्घाटन केल्यानंतर शिंदे म्हणाले की, आजच्या हवामान बदलाच्या युगात कार्बन उत्सर्जन कमी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे अधिकृत प्रकाशनात म्हटलेले आहे. आजच्या हवामान बदलाच्या युगात कार्बन उत्सर्जन कमी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे आणि हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी बांबूची लागवड करणे हे फार महत्त्वाचे आहे.

महाराष्ट्रातील बांबू लागवड उपक्रमाद्वारे कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांचे राज्यातील शेतकऱ्यांनी कौतुक केले. यावेळी शिंदे म्हणाले की, पर्यावरण संतुलन राखण्याच्या क्षमतेसाठी ओळखला जाणारा बांबू इतर झाडांपेक्षा जास्त कार्बन शोषतो. तसेच राज्यात नागरी जंगले उभारण्याची आणि प्रमुख महामार्गांवर बांबूची लागवड करण्याची सरकारची योजना आहे.

बायोमास स्त्रोत म्हणून बांबूचे महत्त्व, इथेनॉलचे उत्पादन करून केंद्र सरकारने औष्णिक ऊर्जा प्रकल्पात वापरण्यास मान्यता दिली असल्याची माहितीही त्यांनी दिलेली आहे. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, राज्य सरकार शेतकऱ्यांना बांबू लागवडीसाठी प्रोत्साहन देत असून शेतकऱ्यांनी बांबूची लागवड केल्यास त्यांना हेक्टरी 7 लाख रुपये अनुदान दिले जामार आहे.