Agriculture News | सरकारची दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा


Agriculture News | महाराष्ट्रात यंदा अत्यल्प पाऊस झाल्याने राज्यातील अनेक भागात डिसेंबर महिन्यातच दुष्काळजन्य स्थिती निर्माण झाली आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे यंदा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईशी लढत हंगाम काढावा लागत आहे. यातच राज्य सरकराने दुष्काळी भागातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक माहीती दिलेली असून राज्यातील 40 दुष्काळी तालुक्यांमधील 1021 मंडळांना या निर्णयामुळे मोठा फायदा होणार आहे.

राज्य सरकराने दुष्काळी भागातील शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची घोषणा केली असून शेतकरी कर्ज वसुलीसाठी राज्य सरकारकडून स्थगिती देण्यात आली आलेली आहे. तसेच शेतकरी संबधित कर्जाचे पुनर्गठन करण्याचे आदेश राज्य सरकारकडून देण्यात आलेले आहेत. महाराष्ट्रातील 40 दुष्काळी तालुक्यातील तब्बल 1021 महसुली मंडळांना या कर्ज वसूली स्थगितीमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. राज्य सरकारच्या सहकार आणि पणन विभागाने शेतीशी निगडीत कर्ज वसुलीस स्थगिती दिली असून, कर्जाचे पुनर्गठन करण्याचे आदेश काढण्यात आले आहेत.

Agriculture News | नाशिक जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता वाढली…

नाशिक जिल्ह्यातील काही भागात सध्या सरकरी यंत्रणेकडून 440 गावं आणि वाड्यांवरील 2 लाख 4 हजार 260 नागरिकांना 127 टँकरद्वारे पिण्याच्या पाण्यासाठी पाणीपुरवठा केला जात असून यापैकी नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात सर्वाधिक 199 गावं तसेच वाड्यांना 35 टँकरद्वारे पिण्याचे पाणी पुरवल्या जाते आहे. नाशिक जिल्ह्यात पावसाळ्यात पुर्ण एका महिन्याचा ‘ड्राय स्पेल’ गेला आणि त्यानंतरच्या काळातही अपेक्षित असा पाऊस झाला नसल्याने पाणीपातळी घटत 54 पैकी 10 तालुक्यांत डिसेंबर महिन्यातच पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत आहे.

नाशिक जिल्ह्यात यंदा अत्यल्प पाऊस झाल्याने आता नाशिककरांवर पाणीटंचाईची भीषण स्थिती ओढावलेली असताना यात प्रमुख म्हणजे नाशिक जिल्ह्यातील बागलाण, चांदवड, नांदगाव, मालेगाव, देवळा, सिन्नर, येवला या विभांगाचा समावेश आहे. सध्या या विभागांमध्ये 16 शासकीय तसेच 111 खासगी टँकरद्वारे 154 गावे आणि 286 वाड्यांवर टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे.