Seeds | महाराष्ट्र सरकारच्या ‘राज्य बियाणे उपसमिती’ची आज ५३ वी बैठक


Seeds | महाराष्ट्र सरकारच्या ‘राज्य बियाणे उपसमिती‘ची आज ५३ वी बैठक सकाळी साडेएकरा वाजता अप्पर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे. केंद्र सरकारच्या बियाणे समितीतर्फे पिकांचे नवे वाण अधिसूचित करण्यासाठी राज्य बियाणे उपसमितीची केंद्र शासनास शिफारशीची आवश्यकता असते. दरम्यान, यामुळेच राज्यातील अनेक कृषी विद्यापीठांच्या संशोधक संचालकांनी प्रस्तावित केलेल्या तब्बल २२ अन्नधान्ये, फळे आणि भाजीपाला या पिकांच्या वाणांबाबत या आयोजित बैठकीत चर्चा करून केंद्र सरकारकडे शिफारस केली जाणार आहे. (Seeds)

Farmers Loan | ‘हे’ सरकार शेतकऱ्यांना देतंय स्वस्त कर्ज!

अशी आहेत बियाणे

यात राहुरी कृषी विद्यापीठाच्या भात (फुले कोलम), भात (फुले सुपर पवना-१३-१-२१९), उडीद (फुले राजन), मुग (फुले सुवर्ण), ऊस (फुले-१५०१२), ज्वारी (फुले पूर्वा-२३७१), मका (फुले उमेद आणि फुले चॅम्पियन), दापोली कृषी विद्यापीठाच्या भात (कोकण-संजय आणि कोकण-खारा), भगर (कोकण-सात्विक), मराठवाडा कृषी विद्यापीठाचे ज्वारी (परभणी शक्ती – पीव्हीके १००९), कापूस (एनएच ६७७), सोयाबीन (एमएयूएस-७३१), हरभरा (परभणी चना-१६ बिडीएनजी २०१८-१६), तीळ (टीएलटी १०), अकोला कृषी विद्यापीठाचे मका हायब्रीड (पीडीकेव्ही आरंभ-१८-२), राळ (पिडीकेव्ही यशश्री – ८२), सूर्यफुल (सूरज पिडीकेव्ही-९६४)

Water Shortage | नाशिकमध्ये पाणीबाणी; बघा कोठे किती पाणीसाठा..?

या अन्नधान्य पिकांच्या प्रस्तावासोबतच ‘फलोत्पादन’ या विभागाच्या राजमा (फुले विराज), कवठ (प्रताप-१), लसूण (पूर्णा एकेजी-७), मिरची (पीबीएनएस-१७), टोमॅटो (पीबीएनटी-२०), वाली (कोकण शारदा- डीपीएल-९), तर केगाव संशोधन केंद्राचे डाळिंब, सोलापूर अनार दाणा या फळे व भाजीपाला पिकांच्या प्रस्तावांना चर्चा करून मान्यता देण्यात येणार आहे. (Seeds)