Farmers Loan | भारत हा कृषीप्रधान देश असून देशात शेतकऱ्यांसाठी अनेक उपाययोजना केल्या जातात. यातच ओडिशा सरकारने शेतकऱ्यांसाठी एक नवीन योजना आणली असून ओडिशा सरकार शेतकऱ्यांसाठी सतत प्रयत्न करत असते. सध्या ओडिशा सरकारने शेतकऱ्यांना बिनव्याजी एक लाख रुपयांपर्यंतचं कर्ज मंजुर केलेलं आहे. याशिवाय, ओडिशामध्ये ‘व्याज सबसिडी अनुदान’ नावाच्या या योजनेसाठी 5700 कोटी रुपयांची रक्कम जारी करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांना मिळणार बिनव्याजी कर्ज
ओडिशातील राज्य सरकारने केलेल्या नियमानुसार, 1 ते 3 लाख रुपयांपर्यंतचे कृषी कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना 2 टक्के व्याज मिळणार असून 1 एप्रिल 2022 पूर्वी कर्ज घेतलेल्या राज्यातील शेतकऱ्यांनाही कर्जाचे व्याजदर लागू होणार आहे. यापूर्वी, राज्याच्या प्रमुख योजना कालिया अंतर्गत, शेतकऱ्यांना 50,000 रुपयांपर्यंतच्या कर्जावर व्याजमुक्त पीक कर्ज दिले जात होते आणि ओडीशातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात मदत झाली होती.
Farmers Loan | ही योजना पाच वर्षांसाठी लागू करण्यात आली
किसान तकच्या बातमीनुसार, शेतकऱ्यांसाठी आणलेली ‘ही’ योजना ५ वर्षांसाठी लागू असणार आहे. राज्यातील शेतकऱ्यांना परवडणारे कर्ज मिळावे म्हणून ही योजना सहकारी बँकांमध्ये 2023-24 ते 2027-28 या कालावधीत लागू होणार आहे. 2022-23 मध्ये सुमारे 32.43 लाख शेतकऱ्यांनी सहकारी बँका आणि प्राथमिक कृषी सहकारी संस्थांकडून वार्षिक 0 टक्के व्याजदराने 1 लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी पीक कर्ज घेतलेले आहे. आता सहकारी बँका आणि PACS द्वारे झालेल्या नुकसानाची भरपाई करण्यासाठी, ओडीशा राज्य त्यांना व्याज अनुदान किंवा सबव्हेंशन प्रदान करत आहे.
एका अहवालानुसार, सहकारी बँकांनी 2000-01 या वर्षात 6.40 लाख शेतकऱ्यांना कृषी कर्ज दिले असून, ते 438.36 कोटी रुपयांवरून 438.36 कोटी रुपयांपर्यंत वाढण्यात आले आहे. दरम्यान, त्याचवेळी 2022-23 मध्ये 34.57 लाख राज्यातील शेतकऱ्यांना 16683.57 कोटी रुपयांचे कर्ज देण्यात आलेले आहे. सध्या राज्यात दिलेल्या एकूण पीक कर्जापैकी ५५ टक्के कर्ज सहकारी संस्था देतात, तर राष्ट्रीय सरासरी १७ टक्के आहे. यामुळे ओडिशा सरकार शेतकऱ्यांना स्वस्त कर्ज देणार आहे.