Rain Machine | राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीत पर्जन्यमापन यंत्र; कृषी मंत्र्यांची मोठी घोषणा


Rain Machine | सध्या राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरू असून आज हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. या अधिनेशनात सोमवारी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक घोषणा केल्या आहेत. यातच महाराष्ट्रातील कांद्याची महाबॅंक, केंद्रीय पाहणी पथकाने सादक केलेला अहवाल, राज्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी विशेष टास्क फोर्स आदी बाबींचा समावेश आहे.

आता राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांसाठी आणखी एक मोठी घोषणा केली असून आता राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये पर्जन्यमापन यंत्र बसवण्याचे नियोजन सुरु असल्याची घोषणा करण्यात आली आहे. या यंत्राद्वारे शेतकऱ्यांना पावसाची अचूक माहिती मिळू शकेल असं विधानपरिषदेत धनंजय मुंडे म्हणाले आहेत. तसेच शेतकऱ्यांचे कष्ट कमी करण्यासाठी राज्यात ‘ड्रोन मिशन’ राबवणार असल्याची घोषणादेखील यावेळी मुंडे यांनी केली आहे.

राज्यातील शेतकरी यंदा पहीले दुष्काळ त्यानंतर अवकाळी आणि गारपीट यामुळे पुरते मेटाकुटीला आलेले आसताना सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी काही उपाययोजना कराव्यात अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. दरम्यान, शेतकऱ्यांना दोन्ही हातांनी देण्याची नियत असलेले हे सरकार असून नमो किसान महासन्मान, पीकविमा, अवकाळीचे अनुदान यांसहीत विविध योजनांची आकडेवारी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी विधानपरिषदेत मांडली. काल विधानपरिषदेत नियम 97 अंतर्गत चर्चेच्या उत्तराच्या निमित्ताने मुंडे बोलत होते.

 Rain Machine | पर्जन्यमापन यंत्र कसं काम करणार ?

आता राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये पर्जन्यमापन यंत्र बसवण्याचे नियोजन सुरु असल्याची घोषणा राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी केली आहे. दरम्यान, राज्यातील 16 हजार ग्रामपंचायतमध्ये आधुनिक पर्जन्यमापन यंत्र बसवण्याचे नियोजन महाराष्ट्र सरकार करत असून पहिल्या टप्प्यात 3 हजार पेक्षा अधिक ग्रामपंचायातमध्ये हे यंत्र बसवण्यात येईल. या यंत्राद्वारे शेतकऱ्यांना पावसाची अचूक माहिती मिळू शकेल तसेच पावसाचे मोजमाप आणि त्यामुळे झालेल्या नुकसानीची अचूक माहिती मिळू शकेल तसेच त्यानुसार निर्णय घेणं सोपं होईल असेदेखील कृषीमंत्री धनंजय मुंडे म्हणाले.

राज्यात ‘ड्रोन मिशन’ राबवण्यात येणार ..

आजकाल राज्य आणि केंद्र सरकार शेती आधुनिकीकरणाकडे भर देताना दिसत आहे. यातच शेतीत ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करण्याची शक्यता तपासून आता शेतकऱ्यांचे कष्ट कमी व्हावेत यादृष्टीने राज्यात ‘ड्रोन मिशन’ राबवण्यात येणार असून कृषी विद्यापीठातून याबाबतचा स्वतंत्र डिप्लोमा कोर्स सुरू करण्यात आलेला आहे. या सगळ्याचा शेतकऱ्यांना नक्कीच लाभ होऊ शकेन, असं विधानपरिषदेत धनंजय मुंडे म्हणाले आहेत.