Rain Alert | ‘या’ भागात बरसणार अवकाळी..


Rain Alert | हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार काही भागात पावसाची शक्यता आहे..

Rain Alert | यावर्षी पावसाने शेतकऱ्यांची सातत्याने चिंता वाढवली आहे. आधी ऐन पावसाळ्यात पावसाने दडी मारल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडले होते. त्यानंतर जेमतेम पाण्यावर शेतकऱ्यांनी पीक उभे केले तर, त्यातही अवकाळीने त्यांना फटकारले. नाशिक जिल्यातील शेतकर्यांना याचा मोठा फटका बसला होता. यात द्राक्ष आणि कांदा या प्रमुख पिकांसह अन्य पिकांचेही मोठे नुकसान झाले होते. दरम्यान, आता हवामान विभागाकडून पावसासंबंधित पुन्हा एक महत्त्वाची बातमी आली आहे. महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये पुन्हा एकदा अवकाळी पाऊस बरसण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

Crop Damage | शेतकऱ्यांनो थंडीमुळे पिके खराब होताय तर सरकार देणार भरपाई

पूर्व भारतात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. दरम्यान, कमी दाबाचा पट्ट्याच्या प्रभावामुळे नागपूर मध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावलेली आहे. यामुळे आता विदर्भात पुन्हा एकदा अवकाळी बरसण्याची शक्तयता आहे. तर आगामी काही दिवसांत विदर्भाच्या काही जिल्ह्यांत अवकाळी पाऊस दाखल होऊ शकतो. (Rain Alert)

अचानक येणाऱ्या या अवकाळी पावसामुळे विदर्भातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होऊ शकते. तसेच या पावसामुळे वातावरणीय बदल देखील होण्याची शक्यता आहे. आय.एम. डी. च्या अंदाजानुसार पूर्व भारतात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून, याचा प्रभाव विदर्भात होणार आहे. विदर्भाच्या पूर्वेकडील जिल्ह्यांमध्ये अवकाळीची दाट शक्यता आहे.

Rain Alert | या जिल्ह्यात सरी बरसणार..

या जिल्ह्यांमध्ये नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली यांचा समावेश आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी त्यांच्या पिकांची काळजी घेण्याची गरज आहे. आधीच ढगाळ वातावरणामुळे आणि आता अवकाळी पाऊसामुळे पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. या पिकांमध्ये गहू, हरभरा या पिकांचा समावेश आहे.

Weather Department | केंद्र शासनाचा मोठा निर्णय; ‘हे’ केंद्र होणार बंद

नागपूर सह आजूबाजूच्या काही जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाच्या हलक्या सरी बरसतील. तर पुढील दोन ते तीन दिवस अवकाळीचे सावट कायम राहील. मात्र, अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे यानंतर थंडीची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता असून, शेतकऱ्यांनी त्यांच्या पिकांची काळजी घेण्याचे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी थंडीचा तडाखा वाढला आहे. याचे पिकांवरती दुष्परिणाम होत असून, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. त्यतच आता खतांच्या आणि शेतीच्या औषधांच्या किंमतीत वाढ होणार आहे. तर शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पुन्हा एकदा कोलमडण्याची शक्यता आहे. (Rain Alert)