Price Update | तुरीला दरवाढीची फोडणी; आणखी वर्षभर तूर राहणार तेजीत


Price Update | महाराष्ट्रातील सर्वात आवडतं जेवण म्हणजे वरण-भात. वरण-भात हे महाराष्ट्राच्या जेवणाची ओळख आहे. याच वरणासाठी लागणाऱ्या तुरीच्या दाळीसंदर्भात एक नविन अपडेट समोर आली आहे. यंदा महाराष्ट्र तसेच कर्नाटकमध्ये तुरीच्या उत्पादनाला मोठा फटका बसला असून नवीन तुरीचे भाव ९२०० प्रति क्विंटलपर्यंत वधारलेले आहेत. आता शेतकऱ्यांना आधारभूत किमतीपेक्षा जास्त भाव मिळत असले तरी तुरीचं उत्पादन कमी झालं असल्याने त्याचा किती फायदा शेतकऱ्यांना होईल हे जानेवारीतच स्पष्ट होणार आहे.

Price Update | अचानक तुरीचे भाव वाढण्यामागे कारण काय?

यंदा राज्यात अत्यल्प पाऊस झाल्याने याचा मोठ्या प्रमाणात परिणाम शेतीवर झाला असून यामुळे तुरीची लागवड सुमारे ५ टक्क्यांनी घटली आहे. यातच गेल्या काही दिवसांपुर्वी अवकाळी आणि गारपीटीने शेतापिकांचे मोठे नुकसान झालं असून परिणामी फूले आणि शेंगा यांचे देखील उत्पादन कमी झालं आहे. दरम्यान यामुळेच सध्या फुलं तसेच आता तुरीचे भाव वाढलेले आहेत.

भारतातील बाजारात मागच्या सहा महिन्यांपासून तुरीचे भाव चांगलेच तेजीत आहेत. चालू हंगामात देशात तुरीची लागवड घटली असून तर अत्यल्प पाऊस, पावसातील मोठे खंड आणि उष्णतेमुळे तुरीची उत्पादकता कमीच राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे आणखी वर्षभर तूर चांगलाच भाव खाऊ शकते असं मत जाणकारांनी मांडले आहे.

अत्यल्प पाऊस आणि गारपीट या सगळ्या कारणाने सदध्या राज्यातील उत्पादनांवर परिणाम होत आहे यामुळे सध्या बाजारात अनेक उत्पादनांचे बाजारभाव वाढताना दिसत आहे. भारतात मागील खरिप हंगामातील तूर उत्पादनात मोठी घट झाली होती यानंतर तुरीचा तुटवडा निर्माण झाला होता. मागील हंगामात म्हणजेच २०२२-२३ च्या हंगामात भारतात फक्त ३३ लाख टन तूर उत्पादन झालेले होते, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले होते.