PM Kisan | शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी यासाठी केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान किसान सन्मान निधी ही योजना आणली होती. यालाच संलग्न अशी ‘नमो शेतकरी’ महासन्मान ही योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केली आहे. मात्र, महाराष्ट्रातील अनेक शेतकरी या योजनेपासून वंचित राहिले. तर, कोल्हापूर जिल्ह्यातील पीएम किसान सन्मान योजनेपासून अनेक शेतकरी वंचित राहिले असून, अनेक शेतकऱ्यांनी योजणेसाठी पात्र असूनही आवश्यक कागदपत्रे अपलोड केलेली नाही किंवा केवायसी केलेली नाही. याबाबतची आकडेवारी पाहता तब्बल २२ हजार ५७६ शेतकऱ्यांनी ई-केवायसी आणि २५ हजार ७७६ शेतकऱ्यांनी बँक आधार लिंक केलेले नाही.
PM Kisan | कृषी विभागाची मोहिम
दरम्यान, या शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून नवीन संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. येत्या बुधवारपर्यंत कृषी विभागातर्फे विशेष मोहीम राबवण्यात येणार असून, या अंतर्गत संबंधित शेतकऱ्यांसाठी ई-केवायसी व बँक आधार लिंक करून देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच या सुविधेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.
पण, कोल्हापूरमधील एकूण २२ हजार ५७६ पात्र शेतकऱ्यांनी या योजनेसाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता केली नसून, तसेच ई-केवायसीही केलेली नाही. २५ हजार ७७६ लाभार्थी शेतकऱ्यांनी बँक आणि आधार लिंकिंग केलेले नाही. तर, या शेतकऱ्यांना ‘आपले सरकार सुविधा’ केंद्रांतर्फे ई-केवायसी प्रमाणीकरण करण्यासाठी बुधवारपर्यंत कृषी विभागातर्फे विशेष मोहीम राबवली जाणार आहे. (PM Kisan)
PM Kisan | ‘पीएम किसान’चा लाभ हवा असेल तर, आताच ‘या’ बाबींची पूर्तता करा
१६ वा हप्ता फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात
या मोहिमेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी करणे प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांनी जवळच्या आपले सरकार केंद्रामार्फत तांचे प्रलंबित असलेले ई-केवायसी प्रमाणीकरण पूर्ण करावे. तसेच या शेतकऱ्यांनी स्वतःचे ई-केवायसी प्रमाणीकरण करण्यासाठी आपल्या मोबाईलवरील ओटीपी, सामायिक सुविधा केंद्र, पीएम किसान फेस ऑथेंटिफिकेशन अँप या सुविधांपैकी कोणत्याही एका सुविधेचा वापर करून प्रलंबित कामे लवकरात लवकर पूर्ण करावी. कारण पीएम किसान योजनेचा १६ वा हप्ता हा फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात वितरित होणार आहे.
तर, प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांनाच ‘नमो शेतकरी’ महासन्मान या महाराष्ट्र सरकारच्या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला या दोन्ही योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर, बुधवारपर्यंत आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून बँक आधार लिंकिंग व ई-केवायसी करणे आवश्यक आहे.
PM Kisan | ‘या’ योजनेसाठी सरकारने घातली नवी अट
ई-केवायसी नाही तर, हप्ता नाही
दरम्यान, याबाबत अधिक माहितीसाठी तुमच्या नजीकच्या तालुका कृषी अधिकाऱ्यांसोबत संपर्क साधावा. कोल्हापुरातील भुदरगड तालुक्यात पीएम किसान योजनेची लाभार्थी संख्या ही ३२ हजार १५ असून, येथील केवळ ३० हजार ९३५ शेतकऱ्यांनीच ई-केवायसी पूर्ण केलेली आहे. तर यापैकी १,०८० शेतकऱ्यांची ई-केवायसी बाकी आहे. ई-केवायसी पूर्ण केलेली नसल्यास या योजनेचा हप्ता तुमच्या खात्यावर जमा होणार नाही, असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे. (PM Kisan)