Onion News | सोलापुरातील कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या दोन दिवसांपासून नियोजन विस्कळीत झाले आहे. यामुळे कांदा मार्केटमध्ये कांद्याच्या दरात एक हजार रुपयांपेक्षा खाली घसरण झाल्याचे बघायला मिळत आहे. त्याचबरोबर सुट्टीनंतर तब्बल ९८५ ट्रक इतकी कांद्याची आवक झाली होती. दोन दिवसांपासून कांदा लिलाव बंद होता. तर, पुन्हा आज हा लिलाव बंद ठेवण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.(Onion News)
शेतकऱ्यांकडून तीव्र संताप व्यक्त...
रविवार आणि सोमवार या दिवशी ‘सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती’त कांदा लिलाव बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे कांद्याच्या दरात घसरण झाली. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या महिनाभरापासून रोज ५०० पेक्षा जास्त ट्रक इतकी कांद्याची आवक सुरू होती. गेल्या आठवड्यात कांद्याचे दर ३,२०० रुपये असे होते. त्यानंतर काल थेट २,१०० रुपयांपर्यंत दर खाली आले असून, चांगल्या कांद्याला ७०० ते ९०० रुपये दर मिळाला आहे. यामुळे शेतकऱ्यांकडून याचा तीव्र संताप व्यक्त केला आहे.
Onion News | निर्यातबंदीनंतर आता बुरशीजन्य रोगामुळे कांदा उत्पादकांवर रडण्याची वेळ!
येथे कांदा लिलाव बंद असून, देखील सोलापूर मार्केटमध्ये कांद्याची आवक वाढत आहे. महाराष्ट्रातील इतर बाजार समितींच्या तुलनेत सोलापूरमध्ये कांद्याला चांगला दर मिळत होता. मात्र, काल या बाजार समितीत अचानक कांद्याच्या दरात घसरण झाली. कांदा पीकासाठी कांदा उत्पादकांनी जो खर्च केला होता. आता दर खालावल्यामुळे शेतकऱ्यांचा तो खर्चही निघत नाहीये. त्यामुळे शेतकऱ्यांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.(Onion News)
Onion News | काय म्हणाले व्यापारी संचालक...
दोन दिवस सुट्टी असल्यामुळे काल कांद्याची आवक वाढली. हे कांदा लिलाव संपल्यानंतर यार्डमधील गाड्या भरून पाठविण्यास विलंब झाला होता. त्यामुळे आजही कांदा लिलाव बंद ठेवण्यात आले आहेत. आज रात्री गाड्या सोडण्यात येणार असून, उद्या म्हणजेच गुरुवारपासून कांदा लिलाव पूर्ववत होतील. त्यामुळे लिलावाचा अंदाज घेऊनच शेतकऱ्यांनी माल विक्रीसाठी मार्केटमध्ये आणण्याचे आवाहन सोलापुरमधील व्यापारी संचालक केदार उंबरजे यांनी शेतकऱ्यांना सांगितले आहे.
Onion Farmers | जिल्ह्यातील ‘या’ पिकांसाठी ही थंडी ठरणार फायद्याची
तर गेल्या वर्षीच्या डिसेंबरमध्ये सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची रेकॉर्डब्रेक आवक झाली होती. यात सोलापूरच्या बाजारात एकाच दिवसात सुमारे दीड हजार पेक्षा जास्त कांद्याच्या गाड्या दाखल झाल्या होत्या. यामुळे बाजार समितीचे कांद्याबाबतचे नियोजन कोलमडले होते. त्यामुळे वाढलेल्या कांद्याची आवक लक्षात घेऊन कांदा लिलाव दुपारी घेण्यात आला होता.(Onion News)