Onion News | अधिवेशनात कांदा गाजला; खासदार भगरेंनी संसदेत मांडल्या कांदा उत्पादकांच्या व्यथा


Onion News |  सध्या संसदेचे अधिवेशन सुरू असून, या अधिवेशनातही कांदा प्रश्न चांगलाच गाजत असल्याचे पहायला मिळाले. नुकतंच विरोधी पक्ष इंडिया आघाडीच्या खासदारांनी संसदेच्या प्रवेश द्वारावर गळ्यात कांद्याच्या माळा घालून कांद्यावर लादण्यात आलेले अतिरिक्त निर्यात शुल्क याबाबत आवाज उठवत निषेध व्यक्त केला. लोकसभा निवडणुकीत कांदा प्रश्नामुळे सत्ताधारी महायुतीची चांगलीच दमछाक झाली.

कांदा पट्ट्यात महायुतीचा दारुण पराभव झाला. कांद्यावरील निर्यात बंदी जरी उठवण्यात आली असली. तरी कांद्यावर भरमसाठ असा अतिरिक्त निर्यात शुल्क लादण्यात आला असून, यामुळे शेतकऱ्यांना अजूनही तोटा सहन करावा लागत आहे. तसेच केंद्र सरकारच्या या धरसोडीच्या भूमिकेमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय कांद्याची मागणी आणि कांद्याची बाजारपेठ कमी होत असून, याचा फायदा पाकिस्तानी कांदा व्यापाऱ्यांना आणि शेतकऱ्यांना होत आहे.

Devendra Fadnavis | नाशिकमधून फडणवीसांची कांदा उत्पादकांसाठी मोठी घोषणा

 परिणामी श्रीलंका, बांग्लादेश, युएई यासारख्या शेजारील देशांवर अवलंबून रहावे लागत आहे. मागील वर्षभरापासून कांदा निर्यात शुल्क, कांदा निर्यात बंदी यामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी पार मेटाकुटीला आला असून, संसदेत शून्यप्रहरात दिंडोरी लोकसभा मतदार संघाचे खासदार भास्कर भगरे (Bhaskar bhagare) यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा संसदेत मांडल्या. (Onion News)

खासदार भास्कर भगरे यांना शून्यप्रहरामध्ये बोलण्याची संधी मिळताच त्यांनी दिंडोरी मतदारसंघासह उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख पीक असलेल्या कांदा प्रश्नी आवाज उठवत कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी भूमिका घेतली आणि शेतकऱ्यांचा आवाज बुलंद केला. खासदार भास्कर भगरे यांनी संसदेत शून्य प्रहरात बोलताना सर्वप्रथम जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधत आदिवासी दिनाच्या आदिवासी बांधवांना शुभेच्छा दिल्या.

Dindori Lok Sabha | कांदा उत्पादकांना भारती पवारांची गॅरंटी; ‘मी निवडणून आल्यास हक्काने…’

Onion News | काय म्हणाले खासदार भास्कर भगरे..?

तसेच कांदा प्रश्नावर बोलताना जरी कांद्यावरील निर्यात खुली केली असली तरी निर्यात मूल्य व त्यावर आयात शुल्क लावल्याने जागतिक बाजारपेठेत कांद्याला जास्त भाव मिळत असतानाही त्याचा भारतातील शेतकऱ्यांना फायदा होत नाही.
तरी तातडीने निर्यात शुल्क हटवून कोणत्याही अटी शुल्क लादल्याशिवाय निर्यात खुली करावी व थेट शेतकऱ्यांकडून नाफेडने कांदा खरेदी करावी शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी केली.