Cabinet Decision | मुंबई : आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची (Maharashtra Cabinet Meeting) बैठक पार पडली असून, या बैठकीत महायुती सरकारने काही महत्त्वाचे आणि मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. या बैठकीसाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील उपस्थित होते. पुढील काही महिन्यांत कधीही विधानसभा निवडणूकीची बिगुल वाजू शकतात. या पार्श्वभूमीवर आता होणारी मंत्रिमंडळाची प्रत्येक बैठक ही महत्त्वाची असणार आहे.
दरम्यान, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीकडेही सर्वांचे लक्ष लागलेले होते. महायुती सरकार (Mahayuti Sarkar) आजच्या बैठकीत कोणते मोठे निर्णय घेणार..? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार होते. आजचया राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत एकूण 8 महत्त्वाचे निर्णय घेतले आहे. यात दूध उत्पादकांसाठीही महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार विदर्भ व मराठवाड्यात दुग्ध विकासाला चालना देण्यासाठी राज्य सरकारने 149 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. (Cabinet Decision)
Nilesh Lanke Protest | कांदा, दूध दर, कर्जमाफीसाठी खासदार लंकेंचं आंदोलन
Cabinet Decision | महायुती सरकारचे ८ निर्णय
- विदर्भ आणि मराठवाड्यात दुग्ध व्यवसायाच्या विकासाला गती देण्यासाठी 149 कोटीचा निधी मान्यता
- मराठवाड्यातील खालसा झालेल्या वर्ग दोनच्या इनाम आणि देवस्थानच्या जमिनी वर्ग एक करण्याचा निर्णय
- डेक्कन कॉलेज, गोखले अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र संस्था, टिळक महाराष्ट्र विद्यापीठातील शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना वैद्यकीय प्रतिपूर्ती योजनेचा लाभ
- यंत्रमागांना अतिरिक्त वीजदरात सवलतीसाठी नोंदणी करण्याची अट घालण्यात आली होती. जी मार्च 2025 पर्यंत शिथील करण्यात आली आहे.
- शासकीय तसेच खासगी वैद्यकीय महाविद्यालयाच्या निवृत्त झालेल्या अध्यापाकांना ठोक मानधन
- सहा हजार किमी रस्त्यांचे डांबरीकरणाऐवजी सिमेंट काँक्रीटीकरण करण्यात येणार. यासाठी सुधारित 37 हजार कोटीच्या निधीस मंजूरी
- नगराध्यक्षांचा कालावधी आता अडीच वर्षांऐवजी पाच वर्ष करण्यात येणार
- सौर ऊर्जा प्रकल्पांच्या कर्जासाठी केएफ डब्ल्यू कंपनीशी स्थिर व्याजदराने करार केला जाणार
- Subsidy | दूध उत्पादकांसाठी सरकारतर्फे अनुदान; मात्र अटी-शर्तींचा भडीमार