Pik Vima | नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज; 31 ऑगस्टपूर्वी मिळणार 853 कोटी रुपये


Pik Vima : नाशिक (Nashik) जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी गुडन्यूज दिली असून, यानुसार आता जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामातील प्रधानमंत्री पीक विम्याचे (Pik Vima) प्रलंबित असलेल्या 853 कोटी रुपयांचे वितरण केले जाणार आहे. तसेच या प्रकरणी पिकविमा संदर्भात जिल्ह्यातील मंत्री छगन भुजबळ, पालकमंत्री दादाजी भुसे आणि जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची यासंदर्भात बैठक घेणार असल्याची माहितीही कृषीमंत्री धनंजय मुंडे (Agriculture Minister Dhananjay Munde) यांनी दिली आहे. 

दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील तब्बल 5 लाख 88 हजार शेतकऱ्यांना गेल्या वर्षीच्या खरीप हंगामातील प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे शेतकऱ्यांना पीक कापणी प्रयोगाआधारे व उत्पन्नात आलेली घट याबाबत देय असलेले 853 कोटी रुपये इन्शुरन्स कंपनीकडून येणे प्रलंबित होते. काल जनसन्मान यात्रा नाशिकमध्ये आली असताना जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि शेतकऱ्यांनी हा प्रश्न त्यांच्याकडे मांडला. माहिती मिळताच धनंजय मुंडे यांनी कंपनीचे राज्यप्रमुख यांच्याशी संपर्क साधत त्यांना रक्कम तातडीने अदा करण्याचे निर्देश दिले. मुंडे यांच्या सुचनेनुसार आता 31 ऑगस्टपर्यंत शेतकऱ्यांना विम्याची रक्कम मिळणार आहे.  

PM Kisan Sanman Yojna | पीएम किसान सन्मान निधीचा १७ वा हप्ता कधी मिळणार..?

तसेच पिक विमा व जिल्ह्यातील कृषी विषयक समस्यांसंदर्भात पुढील आठवड्यात मुंबई येथे पिकविमा कंपनीचे अधिकारी, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे, जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी यांची एकत्रित बैठक घेत आढावा घेणार असल्याची माहिती यावेळी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. 

जनसन्मान यात्रेदरम्यान कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी नाशिक जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी तसेच शेतकऱ्यांसोबत चर्चा करत शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळा त्यांनी जिलहेतील कृषी अधिकारी व इतर अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आणि त्यांच्याकडून जिल्ह्यातील परिस्थितीची माहिती घेतली. यावेळी इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर, माजी आमदार जयंत जाधव हेदेखील उपस्थित होते.

Sarkari Yojna | ‘या’ पीकांच्या लागवडीवर सरकार देतंय भरघोस अनुदान

गेल्या वर्षी नाशिक जिल्ह्यातील 5 लाख 88 हजार शेतकऱ्यांनी पिक विमा योजनेअंतर्गत विमा घेतला होता. यात 21 दिवसाच्या पाऊस खंडामुळे या शेतकऱ्यांना 79 कोटी रुपयांचा लाभ मिळाला होता. यासोबतच स्थानिक आपत्ती व काढणी पश्चात नुकसानीचे 25 कोटी 89 लाख मंजूर झाले असून, त्याचे वाटप सुरु आहे. त्यानंतर आता कृषीमंत्र्यांच्या निर्देशाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 853 कोटी रुपये मिळणार आहे.