Nashik News | नाशिककरांना दिलासा..! धरणांचा पाणीसाठा वाढला; पुढील दोन दिवस रेड अलर्ट


नाशिक :  गेल्या अनेक दिवसांपासून नाशिककरांना जोरदार पावसाची प्रतीक्षा होती. धरणांनी तळ गाठल्याने नाशिककरांवर पाणी कपातीची टांगती तलवार होती. दरम्यान, मागील दोन ते तीन दिवसांपासून धरण पाणलोट क्षेत्रात संततधार सुरू असल्याने धरणांचा पाणीसाठा वाढला असून, यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. नाशिक जिल्ह्यातील धारणांचा तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इगतपुरी (Igatpuri) तालुक्यात व घाट परिसरात मागील दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस (Heavy Rain) बरसत आहे.

यामुळे नदी-नाले खळाळून वाहत असून, तालुक्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. या जोरदार पावसामुळे इगतपुरी तालुक्यातील दीड हजार दशलक्ष घनफूट साठवण क्षमता असलेले भावली धरण (Bhavali Dam) भरले असून, धरणाच्या (Bhavali Dam) सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे. हे पाणी दारणा नदीच्या पाणलोट क्षेत्रातून दारणा धरणात आणि पुढे जायकवाडी धरणात (Jayakwadi Dam) जाणार आहे. तर, दारणा धरण (Darna Dam) 75 टक्के भरले असून, बुधवारी दारणा धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले आणि यातून 8 हजार 811 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.  

Nashik Onion News | कर्नाटकच्या कांद्याला वेगळा न्याय; नाशिकमध्ये शेतकरी संतप्त, लिलाव बंद

Nashik News | नाशकात दोन दिवस जोरदार पावसाची शक्यता

दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून मुसळधार पावसाची वाट पाहणाऱ्या नाशिककरांना अखेर दिलासा मिळाला असून, नाशिक जिल्ह्यातील काही भागांना पुढील दोन दिवस हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे. तर, काही ठिकाणी यलो अलर्ट देण्यात आला आहे. मागील 24 तासांत जिल्ह्यात सरासरी 21.9 मि.मी. पावसाची नोंद झाली असून, सर्वाधिक पावसाची नोंद ही त्र्यंबकेश्वर तालुक्यात झाली असून, इगतपुरी तालुक्यात 73 मि.मी. पावसाचो नोंद झाली आहे.

 Nashik Onion | खाजगी जागांवर लिलाव सुरू केल्याने जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थांचे धाबे दणाणले

कोणत्या धरणात किती पाणीसाठी 

दरम्यान, नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाच्या (Gangapur Dam) पाणी साठ्यात वाढ होत असून, गंगापूर धरणात सध्या 42.45 टक्के इतका पाणीसाठा आहे. तर, नांदूरमध्यमेशवर धरण क्षेत्रामधूनही पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला असून, आज 5 हजार 576 क्यूसेक वेगाने पाणी सोडले जात आहे. 

  1. कश्यपी धरण – 17.22 टक्के
  2. गौतमी गोदावरी – 42.56 टक्के
  3. आळंदी धरण – 7.23 टक्के
  4. गंगापूर धरण समूहात -35.05 टक्के