Mofat Vij Yojana | सरकारचा मोठा निर्णय; आता शेतकऱ्यांना अखंडित वीज मिळणार


Mofat Vij Yojana | राज्यातील शेतकऱ्यांसाठी शिंदे सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला असून, यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना अखंडित वीज पुरवठा मिळणार आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० चा विस्तार करून त्याची व्याप्ती वाढवण्याच्या निर्णयाला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या कृषीपंपांना दिवसा वीज पुरवठा करण्याच्या हेतूने ‘मुख्यमंत्री सौर कृषी योजना २.०’ ही राज्यभरात राबविली जाते.

या योजनेच्या मध्यमातून २०२५ पर्यंत सौर ऊर्जा निर्मिती क्षमतेचे उद्दिष्ट वाढवण्यात येणार असून, ९००० मेगावॅट अधिक उर्वरीत ७००० मेगावॅट असे एकूण १६ हजार मेगावॉट विकेंद्रित सौर ऊर्जा क्षमता निर्मितीच्या उद्दिष्टास मान्यता देण्यात आली आहे. यामुळे आता राज्यभरातील शंभर टक्के कृषी पंप ग्राहकांना दिवसादेखील वीजपुरवठा करता येणार असून, यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गतदिले जाणारे आर्थिक सहाय्य हे सुरु राहणार आहे.(Mofat Vij Yojana)

 Goverment Scheme | केंद्र सरकारच्या या योजनेमुळे होईल वीज माफ; असा करा अर्ज

महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना’ सुरू करण्यात आली असून, त्यानुसार राज्यातील ४४ लाख ६ हजार शेतकऱ्यांच्या ७.५ अश्वशक्ती क्षमतेपर्यंतच्या शेतीपंपांना संपूर्ण मोफत वीज पुरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी २.० योजनेंतर्गत प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर महावितरणचा वीज खरेदी दर हा कमी होणार असल्याने यातून येणाऱ्या काळात कृषी व औद्योगिक क्षेत्रासाठी दिल्या जाणाऱ्या अनुदानाचा शासनावरील आर्थिक भार कमी होणार असून, त्यामुळे मुख्यमंत्री बळीराजा वीजदर सवलत योजना यशस्वीपणे राबविली जाणार आहे.