Weather News : मोठ्या विश्रांतीनंतर आता राज्यात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झाल्याने बळीराजा सुखावला आहे. जिल्ह्यातील अनेक भागांत गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू असल्याने धरणांच्या पाणीसाठयातही कमालीची वाढ झाली आहे. काही दिवसांवर राज्यात बैल पोळ्याचा (Bail Pola) सण आहे. या सणाला दरवर्षी मुसळधार पाऊस पडतो. मात्र, यंदा राज्यात काही भागात पुर परिस्थिती आहे.
तर, काही भागात अद्यापही समाधानकारक पाऊस नाही. दरम्यान, यंदा पोळ्याला पाऊस कसा असेल..? याबाबत सर्वांनाच उत्सुकता होती. तर, यंदाच्या बैल पोळ्याला जोरदार पाऊस पडणार हा सण पावसात साजरा होणार असल्याचा अंदाज प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डख (panjabrao dakh) यांनी वर्तविला आहे. (Weather News)
Weather Update | ‘या’ जिल्ह्यांसाठी पुढील काही तास महत्त्वाचे; ‘रेड अलर्ट’ जारी
Weather News | ‘या’ तारखेपर्यंत ‘या’ भागात जोरदार पाऊस
दरवर्षी बैल पोळ्याच्या सणाला पाऊस पडतो, असे म्हणतात. त्यानुसार यंदाही बैल पोळा सणाला जोरदार पाऊस बरसणार असून, येत्या 28 ऑगस्टपर्यंत संपूर्ण राज्यात जोरदार पाऊस पडणार आहे. यादिवशी सूर्यदर्शन होणार नसल्याचा अंदाज पंजाबराव डख यांनी वर्तविला आहे. तर, 1 सप्टेंबरपासून राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार होणार असल्याने 2 सप्टेंबर रोजी बैल पोळ्याच्या दिवशी राज्यात जोरदार पावसाची शक्यता आहे.(Weather News)
कोकण, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ या भागात 27 ऑगस्टपर्यंत मुसळधार पाऊस बरसणार असल्याचा अंदाज पंजाबराव डख यांनी वर्तवला आहे. नाशिक, मुंबई, ठाणे, पुणे, सातारा, कोल्हापूर, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, नागपूर, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अमरावती, वर्धा या जिल्ह्यांमध्येही जोरदार पाऊस बरसण्याची शक्यता आहे.
Weather Forecast | एकाच भागात कुठे खूप पाऊस तर कुठे काहीच नाही, असे का होते..?; वाचा सविस्तर…