Igatpuri | दिलासादायक पावसामुळे बळीराजा सुखावला; इगतपुरीत भात लावणीला सुरुवात


इगतपुरी : इगतपुरी तालुक्याच्या पुर्व भागात गेल्या आठवडाभरापासून पावसाची दमदार बॅटिंग सुरु असून टाकेद परीसरात आतापर्यंत 375.70 मी मी (सरासरी 25%) पावसाची नोंद झाली आहे. या परीसरात 60 ते 65% भातलागवड पूर्ण झाली असून सध्या भातलागवडीसाठी बळीराजाला मजुरांची कमतरता जाणवत आहे. तालुक्याच्या पुर्व भागात जून व जुलैचा पंधरवाडा हा पावसाअभावीच गेला होता.

भाताची रोपं शेतकऱ्यांनी कशी तरी जीवंत ठेवली होती. पिंपळगाव मोर, आंबेवाडी, खेड, परदेशवाडी, खडकेद, इंदोरे, अधरवड फाटा या भागात साधारण पाऊस असतो. पण टाकेद, अडसरे, भरवीर या भागात पावसाचे प्रमाण अतिशय कमी असते. तसेच टाकेद परीसरापेक्षा घोटी परीसरात पावसाचे प्रमाण जास्त असते. यामुळे सुरवातीला उभाडे, तळोघ, खैरगाव तळोघ, कांचनगाव, उंबरकोण या पट्ट्यामध्ये आवणीला लवकर सुरवात होते. यासाठी टाकेद भागातून सुमारे 350 ते 400/- रुपये मजुरांना मजुरी देऊन त्यांची येण्या जाण्याची सोय केली जात आहे.(Igatpuri)

Igatpuri | टाकेद शिष्टमंडळाने तहसीलदारांसमोर वाचला स्थानिक समस्यांचा पाढा

Igatpuri | भातलागवडीसाठी मजुरांची कमतरता

त्यानंतर पिंपळगाव मोर, अधरवड, खेड, आंबेवाडी हा भाग भातलागवडीसाठी सुरू होतो आणि सर्वात शेवटी टाकेद परीसरात भातलागवडीला सुरवात होत असते. आज रोजी घोरपडेवाडी, टाकेद खुर्द, बारशिंगवे, सोनोशी, मायदरा, धानोशी, बांबळेवाडी, शिरेवाडी, अडसरे या भागात भातलागवड सुरु झाली आहे, पण सर्वत्र मजुरांची कमतरता भासत आहे. सध्या 350/- रुपये रोज देऊनही मजूर न मिळाल्याने शेतकरी चिंतेत सापडले आहेत. सध्या घोटी परीसरातील भातलागवड संपत आल्याने शेतकरी कांचनगाव, शेनवड, देवळा, खैरगाव इत्यादि ठिकाणावरून स्वत: गाडी करून मजूर आवणीसाठी घेऊन येतात.

Igatpuri | इगतपुरीत यंदा ३१ हजार हेक्टरवर होणार भात लागवड; मशागतीला वेग

भाताच्या ‘या’ वणांना पसंती

बाहेरून मजूर आणायचे म्हटले की, त्यांना येण्या जाण्याची सोय व जास्तीचा रोज द्यावा लागतो. सध्या टाकेद भागात फक्त 65% भातलागवड झाली असून, इंद्रायणी व 1008 या वाणालाच जास्त पसंती दिली जात आहे. तरी एन 125, समृध्दीवाडा, कोलम, अक्षत इत्यादि भात वाणाचीही लागवड केली जात आहे. पावसाच्या संततधारेमुळे नदि नाले ओसंडून वाहत आहेत. पुर्वी शेतकरी व मजूर हे पाणघोंगडे (इरल) वापरायचे. यामुळे पावसापासून सरंक्षण तर व्हायचे पण ते उबदार व थंडीपासूनही आपला बचाव व्हायचा. आता काळाच्या ओघात प्लास्टिक कागद सर्रास वापरला जातो आहे. क्वचितच घोंगडी वापरणारा शेतकरी दिसतो. बैलाचे औतही क्वचितच दिसते. कारण सर्वच ठिकाणी यांत्रिक पध्दतीने शेती सुरु आहे.(Igatpuri)

दरम्यान गेल्या चार पाच दिवसांत पडलेल्या जोरदार पावसामुळे टाकेद व परिसरातील सर्वच नद्या नाले एकाकीच खळाळून ओसंडून वाहू लागले असून शेतांमध्ये पाण्याचे साम्राज्य दिसत आहे. यावर्षी टप्याटप्याने पाऊस पडत असल्याने शेतीपूरक दिलासादायक पाऊस हा मोठा आधार शेतकऱ्यांना होत आहे. सर्वत्र भात लागवडीची एकाकीच घाई बघायला मिळत असल्याने मजूर वर्गाचा मोठा तुटवडा जाणवत असून, शेतकऱ्यांची मोठी कसरत व धावपळ पाहायला मिळत आहे.